मुंबई : मराठी प्रेक्षकांची लोकप्रिय वाहिनी म्हणजे 'झी मराठी'. 'झी मराठी'वरील सगळ्याच मालिका प्रेक्षकांच्या पसंतीला पडतात. प्रत्येकवेळी वेगवेगळ्या विषय घेऊन झी मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येत असे. कधी शहरांमधला तडका तर कधी गावातील मातीचा सुगंध घेऊन झी मराठी ही वाहिनी प्रेक्षकांना भेटते. 'तुझ्यात जीव रंगला' ही वाहिनीवरील लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार अशी चर्चा होती. आता याला पूर्णविराम लागला असून आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
मालिकेतील राणादा म्हणजेच हार्दिक जोशी आणि अंजली पाठकबाई म्हणजेच अक्षया देवधर यांच्या भूमिका विेशेष गाजल्या आहेत. ही जोडी घराघरात पोहोचली आहे.
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. रांगडा गडी 'राणादा' आणि प्रेमळ अंजलीबाई हे दोघे प्रत्येकाच्या कुटुंबाचा भागच बनले. परंतु, आता ही मालिका आपली वेळ बदलत आहे. दररोज सायंकाळी 7.30 वाजता 'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका भेटायला यायची. आता ही मालिका संध्याकाळी 6.30 वाजता प्रसारित होणार आहे.
देशी लग्नाचा विदेशी गुताडा! नवी मालिका 'लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू', २१ ऑक्टोबरपासून सोम ते शनि. संध्या. ७. ३० वाजता #LagnachiWifeWeddingchiBaykoo #ZeeMarathi pic.twitter.com/dQ5JI6hBWK
— Zee Marathi (@zeemarathi) October 3, 2019
सायंकाळी 7.30 वाजता नवी मालिका 'लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू' ही प्रदर्शित होणार आहे. याचा प्रोमो 'झी मराठी'वर दाखविण्यात येत आहे. परदेशात नोकरीनिमित्त गेलेला मुलगा आपल्या गावच्या घरी येतो. त्यावेळी तो कुटुंबातील प्रत्येकाला त्यांच्या आवडीची भेटवस्तू आणतो. मात्र स्वत:ला काहीही आणत नाही. त्यावेळी त्याला तुला काय, असा प्रश्न केला जातो. त्यावेळी तो म्हणतो 'डॉल'. त्यावेळी कुटुंबातील सदस्य म्हणतात यावयात बाहुलीशी घेळणार का? तेव्हा परदेशी मुलीची घरात एन्ट्री होते आणि कुटुंबीयांना चांगलाच धक्का बसतो. असा प्रोमो दाखविण्यात येत आहे. हा प्रोमो संपल्यावर ही मालिका येत्या २१ ऑक्टोबर २०१९ पासून रात्री ७.३० वाजता 'झी मराठी'वर प्रक्षेपित होणार असल्याचे सांगितले जाते. यावरुन 'तुझ्यात जीव रंगला' ही निरोप घेणार असल्याची चर्चा आहे.
तसेच झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम 'होम मिनिस्टर' सायंकाळी 6 वाजता प्रदर्शित होणार आहे. आदेश बांदेकर भाओजी दररोज 6.30 भेटायला येत पण आता या कार्यक्रमाची देखील वेळ बदलली असून 6 वाजता प्रदर्शित होणार आहे.