मुंबई : अभिनेता सलमान खान स्टारर 'दबंग ३' चित्रपट २० डिसेंबर रोजी रूपेरी पडद्यावर दाखल झाला आहे. नाताळच्या मुहूर्तावर सलमानची ही भेट चाहत्यांच्या पसंतीस पडताना दिसत आहे. चित्रपट प्रदर्शनानंतर पहिल्याच दिवशी 'दबंग ३'ने २४.५० कोटी, शनिवारी २४.७५ कोटी रुपयांची कमाई केली. रविवारपर्यंत हे आकडे ४९.२५ कोटींवर पोहोचले.
तर सलग तिसऱ्या दिवशी देखील चित्रपटाच्या कमाईचा आकडा चढत्या क्रमावर आहे. तर आता पर्यंत चित्रपटाने ८१.१५ कोटी रूपयांचा गल्ला पार केला आहे. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या सलमानच्या या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांतच चांगला वेग पकडला आहे.
#Dabangg3 - despite protests affecting its biz severely - packs ₹ 80 cr+ in its *opening weekend*, primarily due to the superstardom of #SalmanKhan... Fri 24.50 cr, Sat 24.75 cr, Sun 31.90 cr. Total: ₹ 81.15 cr. #India biz. Note: All versions.
— taran adarsh (@taran_adarsh) December 23, 2019
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत याविषयीची माहिती दिली. सध्याच्या घडीला देशात सुरु असणाऱ्या नागरिकत्व सुधारणा कायद्याचा विरोध करत सुरु असणाऱ्या निदर्शनांचा फटकाही या चित्रपटाला बसला आहे.
'दबंग ३' या चित्रपटाच्या निमित्ताने मनोरंजनाचा एक अफलातून नजराणा दिला. नवोदित अभिनेत्री सई मांजरेकर, सोनाक्षी सिन्हा यांच्यासह सहकलाकारांच्या साथीने हा सलमान प्रेक्षकांच्या भेटीला आलाय चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच त्याविषयीच्या कमाईबाबत उत्सुकता व्यक्त केली जात होती.
येत्या काही दिवसांत सलमानची दबंगगिरी बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई करेल अशी अशा व्यक्त केली जात आहे. चित्रपट प्रदर्शनापूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे सलमानच्या अडचणीत वाढ झाली होती. परंतु चित्रपटाती वादग्रस्त भाग वगळण्यात आल्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला.