TMKOC | जेठालालच्या नाकी नऊ आणणाऱ्या या खट्याळ मुलाला तुम्ही ओळखळंत का? 

भारतीय टेलिव्हिजन जगतात 13 वर्षे राज्य करणारा शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' दररोज आपल्या लोकप्रियतेचे नवनवे रेकॉर्ड बनवत आहे. 

Updated: Jan 19, 2022, 06:53 PM IST
TMKOC | जेठालालच्या नाकी नऊ आणणाऱ्या या खट्याळ मुलाला तुम्ही ओळखळंत का?  title=

मुंबई : भारतीय टेलिव्हिजन जगतात 13 वर्षे राज्य करणारा शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' दररोज आपल्या लोकप्रियतेचे नवनवे रेकॉर्ड बनवत आहे. शो हिट झाला तर त्यात दिसणारे कलाकारही सुपरहिट होतात. सोशल मीडिया असो की बातम्या, या शोचे स्टार्स सर्वत्र दिसतात. अशा परिस्थितीत आता एक फोटो समोर आला आहे ज्यामध्ये शोचे दोन कलाकार एकत्र दिसत आहेत. या फोटोत दया बेन म्हणजेच दिशा वाकानी आहे. पण दुसऱ्या कलाकाराला ओळखणं हे कठिण काम आहे.

कोण आहे हा चिमुकला? 
दिशा वकाणीने हा फोटो खूप पूर्वी सोशल मीडियावर शेअर केला होता. त्याचवेळी, 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या फॅन पेजवरून हा फोटो शेअर करून पुन्हा एकदा चर्चेचा विषय निर्माण झाला आहे. या फोटोत दिशा वाकाणी खूपच क्यूट दिसत आहे. त्यांच्यासोबत एक सिंह आणि एक एक छोटा मुलगाही दिसत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून दिशा वाकाणीचा खऱ्या आयुष्यातला आणि रील लाइफ भाऊ सुंदर म्हणजेच मयूर वाकाणी आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या फोटोमध्ये मयूर आणि दिशा एकत्र दिसत आहेत. तसंच या फोटोत सिंह देखील दिसत आहे. सिंहाने एवढ्या सहजतेने त्याच्यासोबतचे फोटो कसे क्लिक केले याचं तुम्हालाही आश्चर्य वाटेल. तर आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोटो स्टुडिओमध्ये घेण्यात आला आहे आणि सिंह एडिट करून त्यात अॅड करण्यात आला आहे.