जगातल्या १० सुंदरी, एकमेव भारतीय आणि तीही टॉपवर

दीपिका पदुकोण ही बॉलिवूडची सर्वात प्रतिभावान आणि सुंदर अभिनेत्री मानली जाते. 

Updated: Oct 17, 2022, 08:19 PM IST
जगातल्या १० सुंदरी, एकमेव भारतीय आणि तीही टॉपवर title=

मुंबई : दीपिका पदुकोण ही बॉलिवूडची सर्वात प्रतिभावान आणि सुंदर अभिनेत्री मानली जाते. दीपिका केवळ भारतातच नाही तर परदेशातही खूप लोकप्रिय आहे.'ओम शांती ओम' मधून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणाऱ्या दीपिकाने अनेक सुपर-डुपर हिट चित्रपट दिले आहेत. दीपिकाने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं आहे. त्याचबरोबर दीपिका पदुकोण सौंदर्याच्या बाबतीतही खूप पुढे आहे. बॉलिवूड दिवा दीपिका पदुकोणचा देखील जगातील टॉप 10 सुंदर महिलांच्या यादीत समावेश आहे.

साइंटिस्टने तयार केली ही यादी 
ही सौंदर्य यादी एका शास्त्रज्ञांनी जाहीर केली आहे. ज्यांनी जगातील सर्वात सुंदर महिलांच्या चेहऱ्याचं सौंदर्य मोजण्यासाठी एक प्राचीन ग्रीक टेकनिक लागू करण्यासाठी कंप्यूटरीकृत मॅपिंग स्ट्रॅटजीचा वापर केला आहे. ज्यामध्ये बॉलीवूड अभिनेत्री जोडी कॉमरला सर्वाधिक 98.7 टक्के गुण मिळाले. वास्तविक, विज्ञानानुसार जोडी कॉमरला जगातील सर्वात सुंदर महिला घोषित करण्यात आलं आहे.

त्याचबरोबर बियॉन्से आणि किम कार्दशियन यांनीही टॉप 10 मध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. याशिवाय बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण ही जगातील 10 सर्वात सुंदर महिलांच्या यादीत समाविष्ट असलेली एकमेव भारतीय अभिनेत्री आहे. या यादीत दीपिका नवव्या क्रमांकावर आहे.

या टॉप 10 अभिनेत्रींचं सौंदर्य प्रमाण किती आहे
अहवालानुसार, 'गोल्डन रेशो ऑफ ब्युटी', जिला  Phi म्हणूनही ओळखलं जातं, ही एक गणितीय पद्धत आहे. ज्यामध्ये शारीरिक परिपूर्णतेचं सूत्र लागू केलं जातं. प्राचीन ग्रीकच्या मते, एखाद्याच्या चेहऱ्यावर आणि शरीरावरील विशिष्ट गुणोत्तरानुसार सौंदर्य मोजलं जाऊ शकतं. या यादीतील 10 महिलांना पुढीलप्रमाणे स्थान देण्यात आलं आहे. झेंडाया (94.37 टक्के), बेला हदीद (94.35 टक्के), बियॉन्से (92.44 टक्के), एरियाना ग्रांडे (91.18 टक्के), टेलर स्विफ्ट (91.64 टक्के), जॉर्डिन डन (91.39 टक्के). ), किम कार्दशियन (91.28 टक्के), दीपिका पदुकोण (91.22 टक्के) आणि होयॉन जंग (89.63 टक्के).