लग्न झालेल्या पुरूषांच्या प्रेमात होत्या 'या' अभिनेत्री; आजही आहेत अविवाहित

अभिनेते आणि अभिनेत्रींच्या नात्याची चर्चा देखील होत असते. 

Updated: May 2, 2021, 03:17 PM IST
लग्न झालेल्या पुरूषांच्या प्रेमात होत्या 'या' अभिनेत्री; आजही आहेत अविवाहित  title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये काम करताना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. अशात अभिनेते आणि अभिनेत्रींच्या नात्याची चर्चा देखील होत असते. अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या लग्न झालेल्या पुरूषांच्या प्रेमात होत्या. पण लग्न झालेल्या पुरूषांच्या प्रेमात असलेल्या काही अभिनेत्री अद्यापही अविवाहित आहेत. 

अभिनेत्री आशा पारेख


बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री आशा पारेख देखील लग्न झालेल्या पुरूषाच्या प्रेमात होत्या. निर्माते नासिर हुसैन यांच्यासोबत त्यांचं नाव जोडलं जात होतं. त्यांच्या प्रेमात असल्यामुळे त्यांनी कधीही लग्न केलं नाही. 

अभिनेत्री नगमा


अभिनेत्री नगमा यांनी 'बागी' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. त्यांचं नाव भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार सौरव गांगुली यांच्यासोबत देखील जोडलं गेलं. त्यानंतर त्या विवाहित रवि किशन यांच्या प्रेमात पडल्या. वयाच्या 46व्या वर्षी देखील त्या  अविवाहित आहेत. 

अभिनेत्री शमिता शेट्टी


अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा लहान बहिण शमिता शेट्टी देखील या यादीत आहे. शमिता सर्वप्रथम विवाहित मनोज वाजपेयीच्या प्रेमात होती. त्यानंतर  हरमन बावेजा आमि आफताब शिवदासानी तिचं नाव जोडलं गेलं. वयाच्या 42 व्या वर्षी देखील ती  अविवाहित आहेत. 

अभिनेत्री सुष्मिता सेन 


सुष्मिता सेनने तिच्या बोल्ड आणि हॉट अदांनी सर्वांना घायाल केलं आहे. सुष्मिता आजही अविवाहित आहे. सध्या ती रोहमन शॉलला डेट करत आहे. पण यापुर्वी तिचं नाव विक्रम भट्ट, संजय दत्त, संजय कपूर यांसारख्या अन्य विवाहित पुरूषांसोबत जोडलं गेलं होतं.