Aashram 2: भक्तीच्या नावावर अपराधाला प्रोत्साहन; काशीवाल्या बाबाचं खरं रूप

'आश्रम २' वेब सीरिजचं ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

Updated: Oct 30, 2020, 10:24 AM IST
Aashram 2: भक्तीच्या नावावर अपराधाला प्रोत्साहन; काशीवाल्या बाबाचं खरं रूप  title=

मुंबई : भक्तीच्या नावावर अपराधाला प्रोत्साहन देणाऱ्या 'आश्रम' या वेब सीरिजमध्ये काशीवाल्या बाबाच्या आश्रमात होण्याऱ्या अनेक वाईट प्रसंगांवर चित्रिकरण करण्यात आले. आता या मागचं रहस्य 'आश्रम २' या सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. नुकताच सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. बाबाची भूमिका साकारणारऱ्या बॉबी देओलच्या आश्रममध्ये होणारे महिलांवरील अत्याचार, अनेक वाईट कामकाज इत्यादी गोष्टींमागील गुपित 'आश्रम २'च्या माध्यमातून उघडकीस येणार आहे. 

बॉबी देओलने सीरिजचं ट्रोलर सोशल मीडियावर शेअर करत कॅप्शनमध्ये 'रक्षक की भक्षक, पावन की पापी, काय आहे काशीवाल्या बाबाचं खरं रूप...' असं लिहिलं आहे. आश्रममध्ये होणाऱ्या काळ्या कामांमध्ये ऐकट्या बाबाचा सहभाग नसून इतरांच्या मदतीने आश्रममध्ये वाईट कामकाज सुरू असल्याचे वास्तव सीरिजमध्ये दाखवण्यात आले. 

या सर्व गोष्टींचा अंत निश्चित आहे का? बाबाचं आणि आश्रमचं काळं सत्य सर्वांच्या समोर येणार का? इत्यादी गोष्टी  'आश्रम २'च्या माध्यमातून समोर येणार आहे. प्रकाश झा दिग्दर्शित ही सीरिज ११ नोव्हेंबर रोजी एम.एक्स. प्लेयरवर प्रदर्शित होणार आहे.