पंकज त्रिपाठीच्या 'कडक सिंग' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अनिरुद्ध रॉय चौधरी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘कडक सिंग’मध्ये राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेते पंकज त्रिपाठी, पार्वती थिरुवोथु तसेच बांगलादेशी कलाकार जया अहसान यांच्यासह संजना सांघी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 

Updated: Nov 21, 2023, 01:26 PM IST
पंकज त्रिपाठीच्या 'कडक सिंग' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला  title=

मुंबई : गोव्यातील प्रतिष्ठित 54व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियाच्या इफ्फी उद्घाटन सोहळ्यात, पंकज त्रिपाठी अभिनित बहुप्रतिक्षित 'कडक सिंग' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. आशियातील सर्वाधिक मान्यताप्राप्त व प्रतिष्ठेच्या चित्रपट महोत्सवांपैकी एक असलेल्या ह्या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान, अनेक उच्चपदस्थ सरकारी अधिकारी, मान्यवर, भारतभरातील आघाडीचे स्टार्स व जगभरातील चित्रपट रसिकांच्या उपस्थितीत, या ट्रेलरला  प्रचंड प्रतिसाद लाभला. 

चित्रपटाबद्दलच्या अपेक्षा यामुळे अधिकच वाढल्या आहेत. त्याहून अधिक महत्त्वाचं म्हणजे ‘कडक सिंग’चा वर्ल्ड प्रीमियर गोव्यात इफ्फीमध्ये 'गाला प्रीमियर्स' प्रवर्गात होणार आहे आणि या मानाच्या प्रदर्शन सोहळ्यात सर्व कलावंत व तंत्रज्ञ उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्कंठा व रोमांच अधिकच वाढणार आहे. हा चित्रपट 8 डिसेंबर 2023 रोजी ZEE5वर प्रदर्शित होणार आहे. 

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अनिरुद्ध रॉय चौधरी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘कडक सिंग’मध्ये राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेते पंकज त्रिपाठी, पार्वती थिरुवोथु तसेच बांगलादेशी कलाकार जया अहसान यांच्यासह संजना सांघी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. दिलिप शंकर, परेश पाहुजा, वरुण बुद्धदेव हे कलााकार सह कलाकार आहेत. विझ फिल्म्स आणि केव्हीएन प्रोडक्शन यांचा ओपस कम्युनिकेशन्सशी सहयोग असून, विझ फिल्म्स एचटी कॉण्टेण्ट स्टुडिओ (महेश रामनाथन)  आणि केव्हीएनने  ‘कडक सिंग’ची निर्मिती केली असून, श्याम सुंदर व इंद्रानी मुखर्जी सहनिर्माते आहेत.

या  चित्रपटात ए. के. श्रीवास्तव उर्फ कडक सिंग ह्यांच्या आयुष्याची कहाणी दाखवली आहे. आर्थिक गुन्हे विभागाचे सहसंचालक असलेले एके सध्या मागे जाणाऱ्या (रेट्रोग्रेड) अॅम्निशियाशी झगडत आहेत. एके रुग्णालयात दाखल झाले असताना चित्रपटाची कथा उलगडत जाते. त्यांच्या भूतकाळाच्या विसंगती स्पष्ट करणाऱ्या घटना या सिनेमात दाखवल्या जातात. या  घटनांमुळे एकेंना कल्पनेहून सत्य वेगळे करणं भाग पडतं. अर्धकच्च्या आठवणींच्या चक्रव्यूहात उसलेले असतानाच, त्यांना रहस्यमयरित्या रुग्णालयात आणले गेल्यामागील सत्य उलगडण्याचा निर्धार ते करतात. त्याचप्रमाणे एका आर्थिक गुन्ह्याचा पाठलागही करतात आणि आपले मोडकळीला आलेले कुटुंबही धरून ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. ही कथा एका बिनसलेल्या कुटुंबाचीही आहे.   ‘कडक सिंग’ 8 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शनासाठी सज्ज, केवळ ZEE5वरून!