आजाराच्या विळख्यात नात्यांची गुंतागुंत; पाहा 'द स्काय इज पिंक'चा ट्रेलर

प्रेमकथा आणि  नात्याची गुंतागुंत...

Updated: Sep 10, 2019, 01:51 PM IST
आजाराच्या विळख्यात नात्यांची गुंतागुंत; पाहा  'द स्काय इज पिंक'चा ट्रेलर title=

मुंबई : प्रत्येक प्रेमकथेमध्ये अनेक अडचणी असतात. त्यामुळे ती प्रेमकथा एका वेगळ्या स्तराला जाऊन पोहोचते. अशीच प्रेमकथा 'द स्काय इज पिंक' या चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांना अनुभवता येणार आहे. 'हर लव्ह स्टोरी मैं ट्रॅजेडी होती हैं, और इनके लव्ह स्टोरी मैं ट्रॅजेडी लाने वाली विलन मैं हू.' तर अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अभिनेता फरहान अख्तरच्या प्रेमकथेत खलनायकाच्या भूमिकेत 'दंगल गर्ल' झायरा वसीम झळकणार आहे. आजाराच्या विळख्यात अडकलेल्या नात्यातील आपलेपणा जपण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांना अनुभवता येणार आहे. 

कथेनुसार चित्रपटाचे शूटिंग मुंबई, दिल्ली, लंडन आणि अंदमानमध्ये करण्यात आले आहे. जूही चतुर्वेदीने चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत आणि प्रीतम चक्रवर्तींनी चित्रपटाला संगीत दिले आहे. या चित्रपटाची निर्मिती रोनी स्क्रूवाला आणि सिद्धार्थ रॉय कपूर यांनी केली आहे.

'द स्काय इज पिंक' शिवाय क्रिस पॅट्सच्या 'Cowboy Ninja Viking' या चित्रपटात प्रियंका दिसण्याची शक्यता आहे. याशिवाय तिच्याकडे हॉलिवूड्चे अनेक प्रोजेक्टस देखील आहेत. या चित्रपटात तिच्यासोबत फरहान अख्तर आणि जायरा वसीम देखील झळकणार आहेत. 'द स्काय इज पिंक' चित्रपट ११ ऑक्टोबरमध्ये रूपेरी पडद्यावर होणार आहे.