रणबीर-श्रद्धाच्या अपकमिंग सिनेमाच्या सेटवर तोडफोड, थांबवावी लागली शूटिंग

बॉलिवूड दिग्दर्शक लव रंजन यांचा आगामी सिनेमा ज्यामध्ये रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर ही जोडी दिसणार आहे

Updated: Mar 16, 2022, 04:46 PM IST
रणबीर-श्रद्धाच्या अपकमिंग सिनेमाच्या सेटवर तोडफोड, थांबवावी लागली शूटिंग title=

मुंबई : बॉलिवूड दिग्दर्शक लव रंजन यांचा आगामी सिनेमा ज्यामध्ये रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर ही जोडी दिसणार आहे. आतापर्यंत या सिनेमाचं नाव समोर आलेलं नाही. मात्र आता सिनेमाच्या सेट संबधित एक बातमी समोर आली आहे. समोर आलेल्या बातमीनुसार, मंगळवारी सेट बनवणाऱ्या मजूराने सिनेमाचं शूटींग थांबवलं.

चित्रपटाच्या गाण्याच्या शूटिंगदरम्यान कामगारांनी सेटवर येऊन गोंधळ घातला आणि काम बंद पाडलं. पाच महिन्यांहून अधिक काळ पैसे शिल्लक असल्याचं कामगारांचं म्हणणं आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये कांदिवलीच्या चारकोप भागात चित्रित करण्यात आलं. हा सेट डिलिव्हरी कामगारांनी चित्रपटासाठी तयार केला होता. या रोजंदारी कामगारांचं म्हणणं आहे की, त्यांच्याकडे पाच महिन्यांहून अधिक काळ थकबाकी आहे.

कामगाराची वागणूक पाहून पोलिसांना बोलवण्यात आलं. या वर्करला आरे पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. आणि नंतर फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्पलॉयजचे पदाधिकारीही तिथे पोहचले. आणि कामगारांचा म्हणणं समजल्यानंतर पोलिसांनी त्याला पुन्हा पाठवलं. या प्रकरणी एफडब्लूआईसीईचे प्रेसिडेंट बीएन तिवारीचं म्हणणं आहे की, ज्याठिकाणी कामगारांचे पैसे शिल्लक आहेत, तिथे कामगार स्वत:च काम बंद पाडत आहेत.

लव फिल्म्सने दीपंकर दास गुप्ता यांना या चित्रपटाचे सेट लावण्याचे कंत्राट दिले होते. आणि त्यांना पूर्ण पैसेही दिले होते. असा आरोप आहे की, दीपंकर दास गुप्ता यांनी हा प्रोजेक्ट एका कंपनीला आउटसोर्स केला होता जिथून दोघांनी दीपंकर दास गुप्ता यांच्याशी करार केला होता. या कंपनीने नंतर ते दुसऱ्याला आऊटसोर्स केलं आणि कामगारांचे 1 कोटी 22 लाख रुपये अडकले. 

लव रंजनच्या या चित्रपटाचं नाव अद्याप समोर आलेलं नाही. हा चित्रपट एक रोमँटिक ड्रामा असून पुढील वर्षी ८ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या रोमँटिक ड्रामाआधी लव रंजनने प्यार का पंचनामा, सोनू के टीटू के स्वीटी, आकाश वाणी, चालंग यांसारखे हिट चित्रपट दिले आहेत.