'तो' जन्मदात्या आईलाही मारणार होता; अभिनेत्याचं हादरवणारं रुप आणि रक्तरंजित प्रसंग पाहिला?

रशिया- युक्रेन संघर्ष काय घेऊन बसलात, देशाला हादरवणारा रक्तरंजित प्रसंग पाहिला का? 

Updated: Feb 22, 2022, 09:58 AM IST
'तो' जन्मदात्या आईलाही मारणार होता; अभिनेत्याचं हादरवणारं रुप आणि रक्तरंजित प्रसंग पाहिला?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : विविध मुद्द्यांवर भाष्य करणारे बरेच चित्रपट आजवर बॉलिवूडमध्ये साकारले गेले आहेत. मुख्य म्हणजे काही चित्रपटांच्या प्रदर्शनापूर्वीच त्यांचं वलय तयार झालं, जे पाहता हे चित्रपट साकारण्यासाठी घेण्यात आलेली मेहनत प्रेक्षकांची दाद मिळवून गेली. 

अशात चित्रपटांमध्ये आता 'द काश्मीर फाईल्स'चा समावेश झाला आहे. देशातील अतिशय महत्त्वाच्या प्रांतावर आधारित, तिथल्या मूळ नागरिकांच्या समस्या, त्यांचा दबलेला आवाज आणि कळकळ मांडण्याचा प्रयत्न चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. (the kashmir files )

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ज्यामध्ये काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार, तिथं घडलेला रक्तपात आणि स्वतंत्र काश्मीरची सातत्यानं होणारी मागणी यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. 

अभिनेता चिन्मय मांडलेकर, पल्लवी जोशी, मृणाल कुलकर्णी, मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर या आणि इतरही बऱ्याच कलाकारांच्या चित्रपटाच महत्त्वाच्या भूमिका दिसत आहेत. 

विवेक अग्नीहोत्री दिग्दर्शित या चित्रपटाच्या ट्रेलरनं सोशल मीडियावर अनेकांना खडबडून जागं केलं आहे. 

एकिकडे रशिया- युक्रेनचा संघर्ष सुरु असतानाच दुसरीकडे 'द काश्मीर फाईल्स'चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आल्यामुळे आता हा मुद्दाही चर्चेत येऊ लागला आहे. 

कैक वर्षे धुळ खात पडलेल्या आणि आक्रोशाचा आवाज यंत्रणेपर्यंत जात नसल्यामुळे संतप्तच झालेल्या समाजाचं चित्रण या चित्रपटात केलं गेलं आहे. 

11 मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तेव्हा आता नेमकं वास्तव काय, हे पाहण्यासाठीची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे.