विनोदवीर कपिलच्या चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी

चाहत्यांना धक्का...

Updated: Jan 25, 2021, 11:32 AM IST
विनोदवीर कपिलच्या चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी  title=

मुंबई : दिवसभर थकल्यानंतर कपिलचे चाहते त्याच्या विनोदांची प्रतिक्षा करत असतात. कपिलने जेव्हा हा शो सुरू केला, तेव्हापासुन काही तासांसाठी प्रत्येक जण आपली दुःख विसरून पोट धरून हसत होता, मात्र आता दिवसभराचा थकवा कपिलच्या विनोदी बुद्धीने घालवता येणार नाही. आजच्या या धकाधकीच्या जीवनात माणूस जणू काही हसू विसरूनच गेला आहे. त्यामुळे आनंद शोधण्यासाठी कपिलचा शो एकमात्र उपाय होता. पण आता 'द कपिल शर्मा शो' बंद होणार असल्याच्या चर्चा रंगत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

शोच्या सुरूवातीला कलर्स वाहिनीच्या माध्यमातून हा शो प्रेक्षकांना अनुभवता येत होता. त्यानंतर कपिलने सोनी टीव्हीची वाट धरली. मध्यंतरी सुनील ग्रोवरसोबत झालेल्या भाडणांमुळे देखील शो काही काळ बंद होता. त्यानंतर जुनी टीम आणि नवीन कलाकारांसोबत कपिलने हिंमत न हारता शो पुन्हा सुरू केला. 

मात्र कपिलच्या चाहत्यांना निराश करणारी बातमी समोर येत आहे. लोकांना पोट धरून हसायला लावणारा 'द कपिल शर्मा शो' लवकरच बंद होणार आहे. पण काही दिवसांनंतर कपिल पुन्हा नव्या अंदाजात एन्ट्री करणार आहे. मात्र आतापर्यंत या बातमीवर चॅनल आणि खुद्द कपिलने अधिकृत घोषणा केलेली नाही.