kissing scene मुळे कायद्याच्या कचाट्यात अडकला प्रसिद्ध अभिनेता

स्वप्नातही त्याला असं काही घडेल असं वाटलं नसावं... वाईट फसला...   

Updated: Aug 8, 2022, 01:40 PM IST
kissing scene मुळे कायद्याच्या कचाट्यात अडकला प्रसिद्ध अभिनेता title=

मुंबई : आतापर्यंत कालाविश्वात अनेक कलाकार किसिंग आणि इंटिमेट सीनमुळे चर्चेत आले. त्यापैकी एक म्हणजे अभिनेता फहद फासिल. 'पुष्पा' सिनेमातून लाइम लाइटमध्ये आलेला अभिनेता फहद फासिल कायम अभिनयामुळे चर्चेत असतो. कमल हसनच्या 'विक्रम' सिनेमात एजंटच्या भूमिकेत दिसणारा फहद फासिल सध्या खूप चर्चेत आहे. आज फहद फासिल वाढदिवस साजरा करत आहे.  अभिनेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या जीवनातील काही रंजक गोष्टी जाणून घेऊ.. 

फहाद हा मल्याळम सिनेमातील एक प्रसिद्ध चेहरा आहे. 2002 मध्ये म्हणजे वयाच्या 19 व्या वर्षी त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.  पण Kaiyethum Doorath हा अभिनेत्याचा पहिला सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. 

डेब्यू सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर फहद जवळपास 5 वर्षांसाठी अमेरिकेला गेला होता. जिथे त्याने आपलं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 2009 मध्ये तो पुन्हा मायदेशी परतला. यानंतर अभिनेत्याने एक सिनेमा केला ज्याच्या किसिंग सीनमुळे फहाल वादाच्या भोवऱ्यात अडकला. 

किसिंग सीनवरून वादात आलेल्या फहादला त्याच्या 'डायमंड नेकलेस' सिनेमासाठी कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागला होता. या सिनेमाच्या पोस्टरमध्ये फहाद स्मोकिंग करताना दिसला होता. हा तो काळ होता जेव्हा त्याने अनेक सुपरहिट सिनेमे दिले.