फोटोत दिसणारी ही क्यूट मुलगी आज आहे कॉन्ट्रोवर्सी क्वीन, ओळखा पाहू

सोशल मीडियावरील सध्या नवा ट्रेंड सध्या सुरुये.

Updated: Nov 22, 2021, 04:50 PM IST
फोटोत दिसणारी ही क्यूट मुलगी आज आहे  कॉन्ट्रोवर्सी क्वीन, ओळखा पाहू title=

मुंबई : सोशल मीडियावरील सध्या नवा ट्रेंड सध्या सुरुये. सेलिब्रिटींचे लहानपणीचे फोटो व्हायरल होतात. आणि हे फोटो पाहून ती कोणती स्टार आहे हे ओळखणं कठीण आहे. दरम्यान, फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध ड्रामा क्वीनचा एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. जो पाहून फारच कमी लोक सांगू शकतील की, या फोटोत दिसणारी ही गोंडस मुलगी कोण आहे. फोटोमध्ये साधूच्या कपड्यांमध्ये एक मुलगी दिसत असल्याचं या फोटोत दिसून येतंय. तिचे मोठे केस आणि तिच्या क्यूटनेसने ती चाहत्यांची मने जिंकत आहे.

राखीने तिच्या क्यूटनेसने मन जिंकली
फोटोत दिसणारी ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून ड्रामा क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली राखी सावंत आहे. हा फोटो राखी सावंतच्या बालपणीचा आहे. मात्र, फोटोत दिसणारी ही मुलगी राखी सावंत असल्याचे फार कमी लोक सांगू शकतील. राखी फोटोमध्ये तिच्या क्यूटनेसने चाहत्यांची मनं जिंकत आहे. फोटोमध्ये राखी सावंत कॅमेऱ्यासमोर एक सुंदर स्माईल देताना दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्याच्या डान्सने चाहत्यांना वेड लावलं
आजच्या काळात राखी सावंतला कोण ओळखत नाही. फिल्मी गाण्यांमध्ये आयटम साँन्ग करण्यासोबतच तिने तिची अभिनय कौशल्येही दाखवली आहे. तिने शाहरुख खानच्या 'मैं हूं ना', 'मस्ती'बरोबरच अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याशिवाय ती इतरही अनेक चित्रपटांचा भाग आहे. याची आयटम साँग खूप पसंत केली जातात. याशिवाय राखी तिच्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असते.