मुंबई : बॉलिवूड म्हटलं की, ग्लॅमर, प्रसिद्धी, सौंदर्य यासर्व चांगल्या गोष्टींसोबत एक कटू सत्य म्हणजे कलाकारांच्या वाट्याला येणारा कास्टिंग काऊचचा अनुभव. कित्येक कलाकारांना ब्रेक हवा असल्यामुळे कँप्रोमाईज या शब्दाचा सामना करावा लागतो. आतापर्यंत अनेक कलाकारांनी कास्टिंग काऊचबद्दल आलेले अनुभव उघडपणे सांगितले आहेत. अभिनेत्री ईशा अग्रवालने देखील कास्टिंग काऊचबद्दल स्वतःचा अनुभव सांगितला.
एन्टरटेनमेंट पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत ईशा म्हणाली, 'अभिनयाचा प्रवास सोपा नव्हता. लातूर सारख्या छोट्या शहरातून मुंबईत आपलं वर्चस्व प्रस्थापित करणं एक आव्हान होतं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आई-वडिलांना समजावलं आणि मुंबईत आली. ऑडिशनसाठी भटकत होती.' यानंतर ईशाने तिचा कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला.
'जेव्हा मी मुंईत आली, तेव्हा कास्टिंग करण्याऱ्या एका इसमासोबत माझी भेट झाली. त्याने मला ऑफिसमध्ये बोलावलं. तेव्हा मी माझ्या बहिणीला सोबत घेवून गेली. तेव्हा तो मला म्हणाला आतापर्यंत अनेकांना कास्ट केलं आहे. मला सुद्धा चांगले प्रोजेक्ट देईल असं म्हणाला. त्यानंतर त्याने अचानक कपडे काढायला सांगितले.'
पुढे ईशा म्हणाली, 'कपडे काढल्यानंतर तो माझं शरीर बघू शकेल. मी पुन्हा त्या ऑफिसमध्ये गेली नाही. त्यानंतर पुढचे कित्येक दिवस तो मला मेसेज आणि कॉल करत होता. अखेर मी त्याला ब्लॉक केलं.' ईशाला असा अनुभव आल्यानंतर तिने या क्षेत्रात काम करण्यासाठी इच्छूक असणाऱ्यांना अशा लोकांच्या जाळ्यात न अडकण्याचा सल्ला दिला.