मुंबई : अभिनेत्री पत्रलेखाच्या वडिलांचं निधन झालं आहे. या वाईट गोष्टीमुळे पत्रलेखा अत्यंत दुःखी आहे. तिने स्वतःचं दुःख सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे. वडिलांच्या निधनाची बातमी पत्रलेखाने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. तुम्ही अचानक मला न सांगता कायमचे निघून गेलात म्हणून मला प्रचंड दुःख होत आहे. पत्रलेखाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वडिलांचा फोटो पोस्ट केला आहे.
पत्रलेखाने फोटो पोस्ट करत कॅप्शन देत दुःख व्यक्त केलं आहे. ती म्हणली , 'मी खूप रागात आहे. मी शब्दात सांगू शकतं नाही. तुम्ही काही न सांगताचं गेलात. मी तुमच्यावर खूप प्रेम करते. मी कायम तुमच्यातला एक भाग राहिलं. तुम्ही माझ्या आजू-बाजूलाचं आहातं. आम्हाला एक चांगलं जीवन देण्यासाठी धन्यावाद...'
'तुम्ही कायम प्रचंड काम केलं कारण आम्हाला चांगलं जीवन मिळावं. तुम्ही एक उत्तम पिता आणि पती आहातं. मला तुमचे सगळे मित्र म्हणतात की तुझे वडील खूप चांगले होते. आय लव्ह यू ...' वडिलांप्रती भावना व्यक्त करत पत्रलेखांने एक भावूक पोस्ट लिहीली आहे.