द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' सिनेमा ऑस्करला पाठवा - किरण खेर यांची मागणी

या सिनेमात अनुपम खेर यांनी मुख्य भूमिका साकारली असल्यामुळेच हा सिनेमा ऑस्करसाठी पाठवण्याची मागणी किरण खेर यांनी केल्याची, अशीही चर्चा सुरु आहे.   

Updated: Dec 29, 2018, 06:30 PM IST
द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' सिनेमा ऑस्करला पाठवा - किरण खेर यांची मागणी title=

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून सिनेमा आणि वाद हे जणू समीकरणचं झाले आहे.  अनेक सिनेमांना प्रर्दशनाआधी विरोध सहन करावा लागला. आता सिनेमाला विरोध होण्याआधी त्याच्या ट्रेलरलाच विरोध होण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे. काही दिवंसापूर्वीच बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील आधारित 'ठाकरे' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्यावरुन अनेक वादांना तोंड फुटले. त्यामुळे सिनेमा, ट्रेलर आणि वाद 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' मध्येही पाहायला मिळतोय. केंद्रात काँग्रेसच्या पहिल्या आणि दुसऱ्या कार्यकाळात दहा वर्ष पंतप्रधानपद भूषवलेल्या मनमोहन सिंग यांच्या राजकीय जीवनावर 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' हा आधारित सिनेमा येत आहे.

या सिनेमाच्या ट्रेलरच्या निमित्ताने वादंग निर्माण झाला आहे. द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' सिनेमा ऑस्करला पाठवण्याची मागणी भाजप खासदार आणि अनुपम खेर यांच्या पत्नी किरण खेर यांनी केली आहे. खेर दांपत्य हे भाजपशी निगडीत आहे. या सिनेमात अनुपम खेर यांनी मुख्य भूमिका साकारली असल्यामुळेच हा सिनेमा ऑस्करसाठी पाठवण्याची मागणी किरण खेर यांनी केल्याची, अशीही चर्चा सुरु आहे.

सिनेमावरुन राजकारण

अनुपम खेर यांनी या सिनेमामध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या राजकीय जीवनावर आधारित भूमिका साकारली आहे.  हा सिनेमा भारताकडून ऑस्करसाठी पाठवायला हवा, अशी मागणी भाजप खासदार किरण खेर यांनी केली आहे. किरण खेर या,  भाजपच्या खासदार आणि अनुपम खेर यांच्या पत्नी आहेत. हा सिनेमा इतर सिनेमांपेक्षा नक्कीच वेगळा आहे. त्यामुळे हा सिनेमा ऑस्करसाठी पाठवाण्याची मागणी केली आहे. या मागणीसोबतच त्यांनी राहुल गांधीना चिमटा काढला आहे. त्या म्हणाल्या की, राहुल गांधी नेहमीच अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलत असतात. त्यामुळे त्यांनी हा विचाराचा अवलंब करायला हवा असे म्हटले आहे. काँग्रेस पक्षाने सिेनेमा प्रदर्शनाला विरोधाला अनुसरुन हे वक्त्व्य केले आहे. हा सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षक मनमोहन सिंग यांच्या प्रेमात पडतील असंही किरण खेर म्हणाल्या. या संबंधीचे त्यांनी ट्विट केले आहे.

  

मनमोहन सिंग पंतप्रधान असताना चार वर्ष त्यांचे माध्यम सल्लागार म्हणून काम केलेले, संजय बारगू यांनी लिहिलेल्या पुस्तकावर हा सिनेमा आधारित आहे. त्यामुळे आता हा टोकाचा कोणते नवे वळण घेणार याकडे राजकीय आणि सिनेचाहत्यांचे लक्ष आहे.