'मला गावातल्या माणसानं बनवलं बॉलिवूड स्टार', ओळखलं का या खलनायकाला?

फोटोत दिसणारा अतिशय निरागस दिसणारा हा मुलगा एकेकाळी बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध होता. अनेक चित्रपटांमध्ये त्याने सकारात्मक तर काही सिनेमांमध्ये त्याने नकारात्मक भूमिका केल्या. 

Updated: Oct 5, 2023, 04:28 PM IST
'मला गावातल्या माणसानं बनवलं बॉलिवूड स्टार', ओळखलं का या खलनायकाला? title=

मुंबई : फोटोत दिसणारा अतिशय निरागस दिसणारा हा मुलगा एकेकाळी बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध होता. अनेक चित्रपटांमध्ये त्याने सकारात्मक तर काही सिनेमांमध्ये त्याने नकारात्मक भूमिका केल्या. पण, 1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील या अभिनेत्याने बोला नावाची भूमिका साकारली होती. या सिनेमातील डायलॉग इतके हिट झाले होते की, जे आजपर्यंत कोणीच विसरू शकत नाही.

हा डायलॉग होता,  'यहां से पचास-पचास कोस दूर भी जब कोई बच्चा रोता है, तो मां कहती है- बेटा सो जा नहीं तो गब्बर आ जाएगा.' आता तर तुम्हाला समजलं असेलच की फोटोत दिसणारा हा निरागस मुलगा बॉलिवूडचा हिरो आहे. आणि या अभिनेत्याचं नाव आहे अमजद खान. जो सगळ्यात खतरनाक विलनपैकी एक आहे. जेव्हा अमजद खानने शोले चित्रपटात हा डायलॉग बोलला  तेव्हा ऐकणारा प्रत्येकजण हादरला.

'शोले'मध्ये साकारलेली 'गब्बर' ही व्यक्तिरेखा इतकी प्रसिद्ध झाली होती की, खऱ्या आयुष्यातही अनेकजण अमजदला गब्बर या नावाने ओळखू लागले.  पण, अमजद खानने शोलेमधील गब्बरच्या भूमिकेत ज्या पद्धतीने हा संवाद फेकला. तेव्हा त्याला ही प्रेरणा कुठून मिळाली हे तुम्हाला माहीत आहे का? चित्रपटातील अभिनेत्याची डायलॉग डिलिव्हरीची शैली उत्कृष्ट होती. पण, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, दिग्दर्शक किंवा कोणत्याही स्क्रिप्ट लेखकाने त्याला या शैलीत संवाद बोलण्यास सांगितलं नव्हतं.

अमजद खान यांच्या गावात एक व्यक्ती होती, ज्याची बोलण्याची शैली खूप वेगळी होती. या व्यक्तीची शैली पाहून अमजद खूप प्रभावित झाला. अशा परिस्थितीत जेव्हा त्याला गब्बरची भूमिका मिळाली तेव्हा त्याने त्याच शैलीत संवाद बोलायचा ठरवलं आणि चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी त्याचं खूप कौतुक केलं. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा गब्बरची स्टाईल शोलेसोबतही हिट ठरली.

अमजद खान यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचं झालं तर त्यांनी शैला खानशी लग्न केलं. दोघांच्या वयात खूप फरक होतं आणि तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, एकेकाळी शैला अमजद खानला भाऊ म्हणून हाक मारायची. यानंतर एकदिवशी अमजद खानने शैलासमोर आपलं प्रेम व्यक्त केलं आणि म्हणाला, 'मला भाऊ म्हणू नकोस. लवकर मोठी हो, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे.'

तर दुसरीकडे एका अभिनेत्रीचंही अमजदवर खूप प्रेम होतं. या अभिनेत्रीचं नाव कल्पना अय्यर असं आहे, जी 'राजा हिंदुस्तानी'च्या 'परदेसी-परदेसी' गाण्यात बंजारनच्या भूमिकेत दिसली होती, जी तिच्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री होती. कल्पनाचं अमजदवर इतके प्रेम होतं की, अभिनेत्याची वाट पाहत तिने लग्न केलं नाही. एवढंच नाही तर अभिनेत्याच्या मृत्यूनंतरही कल्पनाने लग्न केलं नाही.