बोल्ड विषयावर आधारित Thank You For Coming ची कंगनाच्या चित्रपटांपेक्षाही वाईट अवस्था, कपूर्स झाले फेल?

Box Office: सध्या बॉलिवूडच्या चित्रपटांच्या गर्दीत चर्चा आहे ती म्हणजे Thank You For Coming या चित्रपटाची. या चित्रपटाचा गाजावाजा इतका झाला की काही विचारू नका. परंंतु 6 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. परंतु प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटानं हवी तशी कमाई केलेली नाही. 

गायत्री हसबनीस | Updated: Oct 8, 2023, 01:51 PM IST
बोल्ड विषयावर आधारित Thank You For Coming ची कंगनाच्या चित्रपटांपेक्षाही वाईट अवस्था, कपूर्स झाले फेल? title=
Thank You For Coming failed on box office collects barely 2 crore worldwide

Box Office: सध्या चर्चा आहे ती म्हणजे Thank You For Coming या चित्रपटाची. सप्टेंबरपासून या चित्रपटाची जोरात हवा होती परंतु यावेळी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फेल गेल्याची चर्चा दिसून येते आहे. त्यामुळे हव्यानं भरलेला फुगा आता चांगलाच फुटला आहे.  हा चित्रपट लाखांच्या घरात कमाई करतो आहे. त्यामुळे बॉलिवूड चित्रपट हे कोट्यवधींच्या घरात कमाई करतात असं पालूपद हा चित्रपट धुळीलाच मिळवतो आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटानं फारच वाईट कमाई केली होती. काल, 7 ऑक्टोबरच्या रिपोर्टनुसार या चित्रपटानं 1.26 कोटी रूपये कमावले आहेत. भारतात या चित्रपटानं एवढी कमाई केली होती. विकीपीडियानुसार, पहिल्या दिवशी या चित्रपटानं भारतात 1.06 कोटी रूपये कमावले. जगभरात 800 स्क्रीन्सवर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाला सेन्सॉरकडूनही 'A' प्रमाणपत्र मिळालं आहे. 

या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चा रंगलेली होती. हा चित्रपट कधी प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे याचीही अनेकांना उत्सुकता लागून राहिली होती. त्यातून आता चर्चा आहे ती म्हणजे या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची. सध्या हा चित्रपट प्रदर्शित होऊन दोन दिवस झाले असेल तरीसुद्धा हा चित्रपट वर सांगितल्याप्रमाणे बॉक्सवर फारशी कमाई करू शकलेला नाही. त्यामुळे हा चित्रपट फ्लॉप गेल्यातच जमा आहे असं म्हणायला फार वेळही लागणार नाही. आता शनिवार आणि रविवार या चित्रपटाला किती लाभदायक ठरतोय हे पाहायला हवं. परंतु यावेळी तिही लक्षणं काही दिसत नाहीत. यावेळी विकेंडचीही कृपा या चित्रपटावर असल्याचे दिसत नाहीये. यावेळी फार मोठ्या प्रमाणात हा चित्रपट फ्लॉप होण्याची शक्यता आहे. कपूरांनी निर्मित केलेला हा चित्रपट यावेळी फारच फ्लॉप ठरला आहे. 

हेही वाचा : रस्त्याच्या कडेला बसून अभिनेत्यानं तळली गरमागरम भजी... नेटकरी म्हणाले, 'कशी दिली दादा'

समोर आलेल्या आकड्यांनूसार, शनिवारी या चित्रपटानं 1.56 कोटी रूपये कमावले आहेत. आता शुक्रवार - शनिवारचे कलेक्शन मिळून या चित्रपटानं 2.62 कोटी रूपये कमावले आहेत. सध्या चर्चा आहे ती म्हणजे जितक्या आत्मविश्वानं हा चित्रपट केला. त्याचे प्रमोशनही फार दणक्यात केले. आम्ही काहीतरी वेगळं करतो. आम्हाला ट्रोल करू नका असा नाराही या चित्रपटातील कलाकारांनी मिळवला होता. परंतु हा चित्रपट सपशेल फेल गेला. चक्क या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी माठ फिरवली आहे.