विजय थलपतीचं बर्थडे सेलिब्रेशन चाहत्याच्या जीवावर बेतलं असतं; आग विझवायला पाण्याऐवजी चुकून पेट्रोल टाकलं अन्...

Vijay's Fan Celebrated His Birthday Turns Into Tragedy : थलपती विजयचा वाढदिवस साजरा करणं चाहत्याला पडलं महागात

दिक्षा पाटील | Updated: Jun 23, 2024, 12:25 PM IST
विजय थलपतीचं बर्थडे सेलिब्रेशन चाहत्याच्या जीवावर बेतलं असतं; आग विझवायला पाण्याऐवजी चुकून पेट्रोल टाकलं अन्... title=
(Photo Credit : Social Media)

Vijay's Fan Celebrated His Birthday Turns Into Tragedy : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता विजय थलपतीचा काल 50 वा वाढदिवस होता. काल त्याच्या वाढदिवसानिमित्तानं खूप मोठं सेलिब्रेशन झालं. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्याचे चाहते देखील खूप आनंदीत होते. त्याचं कारण म्हणजे त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्याच्या 'द गोट' (The Greatest of All Time The GOAT) या चित्रपटाची पहिली झलक पाहायला मिळाली. तर विजयच्या वाढदिवसा निमित्तानं त्याच्या चाहत्यांनी चेन्नईच्या नीलांकरई परिसरात पार्टीचे आयोजन केले होते. त्यावेळी त्या मुलांनी हातावर पेट्रोल टाकलं आणि टाइल्स तोडल्या. या सगळ्यात एक मोठी धक्कादायक घटना घडली आणि एका व्यक्तीला हाताला आग लागली. असं म्हटलं जातं की ती व्यक्ती पेट्रोल घेऊन स्टंट करत होती. 

सोशल मीडियावर थलपती विजयच्या चाहत्यांचा व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यात हे पाहायला मिळतंय की त्याच्या हातावर आग लावून तो टाइल्स तोडताना दिसतो. त्यानंतर जेव्हा आग विझत नाही आणि ती वाढू लागते तेव्हा तो मोठ्या मोठ्यानं ओरडू लागतो. हात झटकतो. पण हातात पेट्रोल असल्यानं आग वाढत जाते. या दरम्यान, तिथे उपस्थित असलेले लोक हातावरची आग विझवून त्याला वाचवतात. त्यानंतर त्याला ते लोक नीरांगरायच्या जवळ असलेल्या रुग्णालयात घेऊन जातात. 

विजयच्या या चाहत्यावर उपचार सुरु आहेत. रिपोर्ट्सनुसार, असं म्हटलं जातं की एका व्यक्तीनं पाण्याच्या कॅनमध्ये पेट्रोल खरेदी करून घेऊन आला होता. त्याला देखील हे अॅडव्हेंचर करायचं होतं. दरम्यान, पाण्याच्या बॉटलमध्ये आणि पाण्याच्या डब्यात पेट्रोल खरेदी करणं बेकायदेशीर आहे.

हेही वाचा : 'सलमान खानशी लग्न कर' सल्ला देणाऱ्याला अमीषा पटेलचा रिप्लाय; म्हणाली, 'त्याचं लग्न..'

थलपती विजयनं त्याचा चाहत्यांना सांगितलं होतं की त्याचा वाढदिवसाच्या साजरा करु नका. त्याचं कारण म्हणजे कल्लाकुरिची येथे अवैध दारूच्या घटनेत 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. यानंतर अभिनेता विजयचं वक्तव्य तमिलगा कजगमच्या सरचिटणीस बुस्सी आनंद यांच्या माध्यमातून समोर आलं. यामध्ये त्यानं म्हटले होतं की, चाहत्यांनी पीडितांना मदत करावी आणि त्याचा वाढदिवस साजरा करू नये.

दरम्यान, विजयच्या कामाविषयी बोलायचं झालं तर तो लवकरच ‘गोट’ या चित्रपटात दिसणार आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं या चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला. तर यात विजय डबल रोलमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर हा चित्रपट 5 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.