मिसेस मुख्यमंत्री म्हणत‌ आहेत, 'तेरी बन जाऊंगी'

फिमेल व्हर्जनमधील 'तेरी बन जाऊंगी' गाण्यानं यूट्यूबवर चांगलाच जोर धरला आहे. 

Updated: Aug 6, 2019, 12:10 PM IST
मिसेस मुख्यमंत्री म्हणत‌ आहेत, 'तेरी बन जाऊंगी' title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या चित्रपटांचे रिमेक साकारण्याचा ट्रेंड सुरू आहे. नुकताच अभिनेता शहिद कपूर आणि अभिनेत्री कियारा अडवाणी स्टारर चित्रपट 'कबीर सिंग' चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटात उद्धवस्त झालेल्या कबीरच्या प्रेमाच्या कथेला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळाली. त्याचप्रमाणे चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही विक्रमी कमाई केली. एवढचं नाही तर चित्रपटातील गाण्यांना चाहत्यांनी तुफान डोक्यावर घेतले. चित्रपटातील रोमॅन्टीक गाणं 'तेरा बन जाऊंगा' या गाण्यानं तर सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#Dwell in the feeling of love! Here's presenting the teaser of my song #TeriBanJaungi ! Song out on 5th August! http://bit.ly/TeriBanJaungiAcousticTeaser @sachdevaakhilnasha #ShaktiHasija @bharatgoelmusic @kumaarofficial #BhushanKumar @tseries.official @tseriesfilms #terabanjaunga #terib

मेल व्हर्जनमध्ये साकारण्यात आलेलं हे गाणं आता चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या आवाजात फिमेल व्हर्जनमध्ये साकारण्यात आलं आहे. खुद्द अमृता फडवीस यांनी फिमेल व्हर्जनमधील हे गाणं स्वत:च्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलं आहे. फिमेल व्हर्जनमधील 'तेरी बन जाऊंगी' गाण्यानं यूट्यूबवर चांगलाच जोर धरला आहे. 

'कबीर सिंग' चित्रपटात शाहिद आणि कियारा यांच्या महाविद्यालयीन आयुष्यावर या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. आता पर्यंत हे गाणं यूट्यूबवर चक्क ३५ मिलियनपेक्षा जास्त चाहत्यांनी पाहिलं आहे.