दाक्षिणात्य अभिनेत्रीची गळफास लावून आत्महत्या

चाहत्यांवर शोककळा पसरली 

Updated: Sep 10, 2020, 08:15 AM IST
दाक्षिणात्य अभिनेत्रीची गळफास लावून आत्महत्या  title=

मुंबई : सिनेसृष्टीसाठी २०२० हे वर्ष अतिशय धक्कादायक आहे. यावर्षी अनेक कलाकारांनी जगाचा निरोप घेतला. आजारपणामुळे कुणी सोडून गेलं तर कुणी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं. सुशांतच्या आत्महत्येचा धक्का अजून कलाकार आणि चाहते पचवू शकले नसतानाच आणखी एका कलाकाराने आत्महत्या केली आहे. 

तेलुगु सिनेसृष्टीतील अभिनेत्री श्रावणी हीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ८ सप्टेंबर रोजी अभिनेता जयप्रकाश रेड्डी यांच निधन झालं. या घटनेतून चाहते सावरत नाही तोच त्यांच्या मनावर श्रावणीच्या आत्महत्येचा आघात झाला. 

अद्याप श्रावणीच्या आत्महत्येचं कारण समजलेलं नाही. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करत आहे. अभिनेत्रीच्या कुटुंबियांनी असा आरोप केला आहे की, देवराज रेड्डी नावाच्या एका व्यक्तीमुळे श्रावणीने एवढं टोकाचा पाऊल उचललं. देवराज हा श्रावणीचा मित्र होता. परंतु तो तिला मानसिक त्रास देत होता. त्यानेच तिला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं. देवराजच्या त्रासाला कंटाळून श्रावणीने हे टोकाचं पाऊल उचललं असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. या व्यक्तीविरोधात पोलिसात तक्रार केली आहे. 

मंगळवारी रात्री १० च्या सुमारास आत्महत्या केली. श्रावणी हैद्राबादच्या एस्सार नगर, पीएस मथुरा नगरमध्ये एच ब्लॉकच्या दुसऱ्या मजल्यावर राहत होती. 

श्रावणी गेल्या आठ वर्षांपासून तेलुगू क्षेत्रात कार्यरत आहे. श्रावणीच्या हिट लीस्टमध्ये 'मौनरागम' आणि 'मनसु ममता' या मालिकांचा समावेश आहे. 'मनसू ममता' या मालिकेत ती काम करत होती.