धक्कादायक! टेलिव्हिजन अभिनेत्रीला वडिलांपासूनच धोका

 तिनं मदतीसाठी हाकही दिली आहे

Updated: Aug 27, 2020, 08:37 AM IST
धक्कादायक! टेलिव्हिजन अभिनेत्रीला वडिलांपासूनच धोका title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अनेकदा कलाकारांचं आयुष्य किंवा या झगमगणाऱ्या दुनियेबाबत सर्वसामान्याना बरंच कुतूहल असतं. या जगण्याचा त्यांना हेवाही वाटतो. पण, हा हेवा वाटत असतानाच अनेकदा कलाकार मंडळींनाही काही कारणास्तव मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो हे दाहक वास्तव मात्र दुर्लक्षित राहतं. सध्या अशाच एका टेलिव्हिजन अभिनेत्रीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या खासगी आयुष्याबाबतची एक गोष्ट सर्वांपुढं मांडत मनातील भीती व्यक्त केली आहे. 

इतक्यावरच न थांबता तिनं मदतीसाठी हाकही दिली आहे. 'कुमकुम भाग्य' या लोकप्रिय मालिकेतून झळकलेल्या अभिनेत्री तृप्ती शंखधर ही तिच्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून सर्वांचं लक्ष वेधत आ. आपल्या वडिलांपासूनच आपल्याला धोका असल्याचा सूर तिनं या व्हिडिओच्या माध्यमातून आळवला आहे. तृप्ती ही मुळची बरेलीची आहे. 

वडील राम रतन शंखधर हे तृप्तीच्या मनाविरुद्ध त्यांच्याच पसंतीच्या एका व्यक्तीशी तिचं लग्न लावून देण्यास निघाले आहेत. असं न केल्यास त्यांच्याकडून तिला जीवे मारण्याची धमकीही देण्यात येत असल्याचं तिनं या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. परिणामी तिनं बरेली पोलिसांकडे मदतीचा हात मागितला आहे. 

वडिलांकडून आपल्याला होत असणाऱ्या मारहाणीचाही उल्लेथ तिनं यात केला असून, मनोरंजन विश्वातील कारकिर्दीसाठी मुंबईत येतेवेळी दिलेले पैसेसुद्धा आता वडीस परत मागत असल्याचा गंभीर आरोप तिनं केला आहे.

 
 
 
 

A post shared by Tripti Shankhdhar (@triptishankhdhar) on

 
 
 
 

A post shared by Tripti Shankhdhar (@triptishankhdhar) on

आणखी एक व्हिडिओ पोस्ट करत या अभिनेत्रीनं आईसह आपण राहतं घर सोडल्याचीही माहिती दिली. दरम्यान, तृप्तीच्या वडिलांशी मात्र या प्रकरणी कोणताही संपर्क झालेला नाही. शिवाय बरेली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे यासंदर्भातील कोणतीही लेखी तक्रार नोंदवण्यात आलेली नाही. पण, तरीही सोशल मीडिया पोस्टच्या आधारावर त्यांनी प्राथमिक स्वरुपात सदर प्रकरणात लक्ष देण्यास सुरुवात केल्याचं कळत आहे.