टेलिव्हिजनवर कधी काळी संस्कारी बहूचा रोल करणारी ही अभिनेत्री 15 वर्षांपासून 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये!

हे जोडपं गेल्या 15 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिप आहे. 

Updated: Aug 20, 2022, 04:40 PM IST
टेलिव्हिजनवर कधी काळी संस्कारी बहूचा रोल करणारी ही अभिनेत्री 15 वर्षांपासून 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये! title=

मुंबई: आजकाल लिव्ह इन रिलेशनशिप्सचा जमाना आहे. बॉलीवूड सेलिब्रेटींच्या लिव्ह इनच्या चर्चा रंगतात तसेच आता टेलिव्हिजन क्षेत्रातील सेलिब्रेटीच्या चर्चेनाही आजकाल भलतेच उधाण आले आहे. अशीच एक जोडी आहे ती टेलिव्हिजन अभिनेत्री अश्लेषा सावंत आणि संदीप बसवाना ही. हे जोडपं गेल्या 15 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिप आहे. 

त्यांनी लग्न करण्याचाही अद्याप कोणताच निर्णय घेतलेला नाही. या दोघांनी हिंदीतील गाजलेल्या 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' या मालिकेत काम केले होते. त्या मालिकेत ते दोघं भावा बहिणीच्या रोलमध्ये होते. 

ही मालिका प्रेक्षकांना त्याकाळी प्रचंड आवडली होती. 2000-2008 पर्यंत ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत होती. तेव्हा अश्लेषा आणि संदीपची जोडीही प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. 

या मालिकेतून संदीपने गंगा (शिल्पा सकलानी) च्या पतीची साहिलची भूमिका साकारली होती. अश्लेषा साहिलचा भाऊ गौतम (सुमित सचदेव) च्या पहिल्या पत्नीच्या तिशाच्या भूमिकेत दिसली. 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' शोच्या सेटवर संदीप आणि अश्लेषा यांची भेट झाली होती. या भेटीचे रुपांतर हळूहळू मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. त्यांनी शेवटी लिव्ह-इनमध्ये राहण्याचा निर्णय केव्हा घेतला. 

संदीपने एका मुलाखतीत सांगितले की आम्ही आधीच ठरवले होते की जोपर्यंत आम्ही आनंदी आहोत तोपर्यंत आपण एकत्र राहूया. अश्लेषाही त्याच्या मताला सहमत होती त्याचबरोबर तिचं असंही म्हणणं होतं की एकत्र राहणं हे महत्त्वाचं असतं. संदीप लिव्ह इन रिलेशनशिपचा प्रकार सुरूवातीला फार चांगला रुचला नव्हता पण नंतर तोही त्यात कम्फर्टेबल होत गेला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अश्लेषा असंही म्हणाली की आम्ही मुलांचा विचार करत असू तर लग्नाचाही विचार करू परंतु अद्याप आम्ही दोघं एकत्र सुखात आहोत