विवाहबाह्य संबंधांमध्ये अडकलेला 'पती पत्नी और वो'

'पती पत्नी और वो' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित  

Updated: Nov 4, 2019, 03:40 PM IST
विवाहबाह्य संबंधांमध्ये अडकलेला 'पती पत्नी और वो' title=

मुंबई : अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि आनन्या पांडे आणि अभिनेता कार्तिक आर्यन 'पती पत्नी और वो' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. कार्तिक चित्रपटात एका चिंटू त्यागी नामक व्यक्तीची भूमिका साकारताना दिसत आहे. वडिलांच्या सांगण्यावरून दहावी ते नोकरी त्यानंतर लग्न असा प्रवास करणाऱ्या कार्तिकच्या नशिबात आराम नसल्याचं चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

चित्रपटात भूमी त्याच्या पत्नीची तर आनन्या त्याच्या गर्लफ्रेंडच्या भूमिकेत दिसणार आहे. १९७८ साली प्रदर्शित झालेल्या ‘पती,पत्नी और वो’ चित्रपटाने चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले होते. या चित्रपटामध्ये संजीव कुमार, विद्या सिन्हा, रंजीता कौर हे प्रमुख भूमिकेमध्ये झळकले होते. 

याच पार्श्वभूमीवर निर्मात्यांनी हा चित्रपट पुन्हा साकारण्याची जबाबदारी घेतली. 'पती पत्नी और वो' चित्रपट ६ डिसेंबर रोजी मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे.