तेजस्विनी सिंग झाली मिसेस इंडिया इंटरनॅशनल...

मानुषी छिल्लरने देशाला मिस वर्ल्डचा किताब जिंकून दिल्यानंतर तेजस्विनी सिंग हीने मिसेज इंडिया इंटरनॅशनलचा किताब भारताला मिळवून दिला.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Jan 27, 2018, 01:56 PM IST
तेजस्विनी सिंग झाली मिसेस इंडिया इंटरनॅशनल... title=

नवी दिल्ली : मानुषी छिल्लरने देशाला मिस वर्ल्डचा किताब जिंकून दिल्यानंतर तेजस्विनी सिंग हीने मिसेज इंडिया इंटरनॅशनलचा किताब भारताला मिळवून दिला.

३२ सुंदर महिलांना मागे टाकले...

सिंगापूर येथे आयोजित झालेल्या विश्व स्तरावरील स्पर्धेत तिने सहभाग घेतला होता. मिसेज इंटरनॅशनलचा किताब जिंकण्याबरोबरच तिला बॉडी ब्युटीफुल स्टाईल ने देखील सन्मानित करण्यात आले. तेजस्विनीने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर जगातील ३२ सुंदर महिलांना मागे टाकत यश संपादित केले.

तेजस्विनी यांची घोडदौड सुरूच...

५ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत टॅलेंट, सांस्कृतिक आणि प्रश्न उत्तर राऊंडमध्ये तेजस्विनीने सर्वाधिक गुण मिळवले. देवरियाच्या खेमदेही गावात राहणारी तेजस्विनी पेशाने व्यावसायिका आहे. ती ऑरगॅनिक ग्रीन्स हर्बल उत्पादन करते. मॅनेजिंग डिरेक्टरच्या पोस्टवर काम करते. हा किताब जिंकल्यानंतर तेजस्विनी येथे थांबणार नाहीये तर ती साऊथ आफ्रिकेत होणाऱ्या जोहर्न बग मिसेस वर्ल्डमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल. यापूर्वीही तिने अनेक क्षेत्रात नाव कमावले आहे.

अलिकडेच या पुरस्काने सन्मानित

अलिकडेच समाजवादी पार्टीच्या अपर्णा यादव यांनी कमी वयात उत्तम काम केल्याबद्दल  तेजस्विनी यांचा वूमन एम्पावर पुरस्कार देवून सत्कार केला.