अल्लाउद्दीन खिल्जी नव्हे तर 'हा' आहे रणवीर सिंहचा ड्रीमरोल

'पद्मावत' चित्रपटाला होणारा विरोध झुगारून प्रेक्षकांनी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये पहायला हजेरी लावली आहे. 

Updated: Jan 27, 2018, 01:03 PM IST
अल्लाउद्दीन खिल्जी नव्हे तर 'हा' आहे रणवीर सिंहचा ड्रीमरोल  title=

मुंबई : 'पद्मावत' चित्रपटाला होणारा विरोध झुगारून प्रेक्षकांनी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये पहायला हजेरी लावली आहे. 

50-55% ओपनिंग मिळालेल्या 'पद्मावत' चित्रपटाला प्रेक्षकांसह, बॉलिवूड आणि क्रिटिक्सनी देखील पाठिंबा दिला आहे.  वादग्रस्त 'पद्मावत' उतरला प्रेक्षकांंच्या पसंतीला ! बॉक्सऑफिसवर कमावला कोटींचा गल्ला

अल्लाउद्दीन खिल्जीचा भूमिकेत रणवीर सिंह  

अभिनेता रणवीर सिंहने 'पद्मावत' चित्रपटामध्ये क्रुर 'अल्लाउद्दीज खिल्जी' साकारला आहे. अनेकांनी या भूमिकेसाठी रणवीरचे कौतुक केले आहे. 

अल्लाउद्दीन खिल्जीसाठी रणवीरने खास 'हल्क' लूक बनवण्यासाठी मेहनत घेतली होती. पद्मावतच्या 'अल्लाउद्दीन' साठी रणवीर सिंहने अशी बनवली बॉडी

जगभरातून रणवीरवर कौतुकाचा वर्षाव होत असला तरीही त्याला ड्रीम रोल हा 'अल्लाउद्दीन खिल्जी'पेक्षा वेगळा आहे. 

रणवीरचा ड्रीमरोल काय ?  

रणवीर सिंहने DNA ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याच्या ड्रीमरोलबाबत खुलासा केला आहे. रणवीरच्या मते, जो रोल त्याला इमोशम करेल त्यावर तो लगेजच मेहनत घ्यायला सुरूवात करेल.  

" आपल्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या ,त्यासाठी घाम गाळणार्‍यांकडे आपले दुर्लक्ष होते. देशासाठी रक्त सांडणार्‍या एखाद्या वर्दीतील असामान्य वक्तीची भूमिका साकारायला आवडेल" असे रणवीर म्हणाला.  

आगामी प्रोजेक्ट्स 

रणवीर सिंह झोया अख्तरच्या 'गल्ली बॉय' चित्रपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपटामध्ये रणवीर एका सामान्य, झोपडपट्टीत  राहणार्‍या मुलाची भूमिका साकारत आहे.