अखेर इतक्या वर्षांनी योग आला.. तेजश्री प्रधानने शेअर केलेल्या फोटोमुळे चर्चेला उधाण

सोशल मीडियावर तेजश्रीने एक पोस्ट शेअर केली आहे. जी पाहून सोशल मीडियावर तिने लग्न केल्याची चर्चा रंगताना दिसत आहे. 

Updated: Feb 26, 2023, 07:44 PM IST
अखेर इतक्या वर्षांनी योग आला.. तेजश्री प्रधानने शेअर केलेल्या फोटोमुळे चर्चेला उधाण title=

मुंबई : गेल्या काही वर्षांत तेजश्री प्रधाननं छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. तिच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य, प्रसन्न भाव चाहत्यांच्या आणि प्रेक्षकांच्या मनावर कोरला गेला. 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतल्या तिच्या अभिनयाचं विशेष कौतुक झालं. तेजश्री तिच्या अभिनयासाठी मोठ्या पडद्यावरही नावलौकिक मिळवत आहे. 

तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर ही जोडी मंदार देवस्थळी यांची मालिका होणार सून मी या घरची मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या जोडीला प्रेक्षकांनी उचलून धरलं. आणि याच मालिकेच्या सेटवर शशांक आणि तेजश्रीच्या जवळीक वाढली. आणि या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.त्यांच्या या निर्णयामुळे प्रेक्षक खूप खूष होते. 

होणार सून मी या घरची या मालिकेतून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली. आणि या मालिकेच्या माध्यमातून एकत्र आलेल्या या जोडीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मालिकेत एकमेकांचे साथीदार असलेले हे दोघे खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे सोबती बनले.  8 फेब्रुवारी 2014 मध्ये शशांक आणि तेजश्रीने पुण्यात लग्न केलं होतं. मात्र अवघ्या वर्षभरातच या कपलने घटस्फोट घेतला त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.  

मात्र आता तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. जी पाहून सोशल मीडियावर तिने लग्न केल्याची चर्चा रंगताना दिसत आहे. या पोस्ट मधील तिचा फोटो पाहून वाटेल की तिचं लग्न झालं की काय पण तसं नाहीय. हा फोटो 12 वर्षांपूर्वीचा आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांच्या सोबतचा हा फोटो असून तिने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

कारण तिने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहीलंय की, 12 वर्षांपूर्वीचा फोटो आणि 12 वर्षांनंतर त्याचं रिक्रेअशन. इतक्या वर्षांनी पुन्हा योग आला. पण तितकंच भारी फिलिंग आहे मोहन काका. आयुष्याच्या प्रवासात अनेक माणसं भेटतात त्यातील काहीच शेवटपर्यंत राहतात. माझ्या पाठिशी कायम असल्याबद्दल तुमचे खूप आभार मोहन काका.' अशी ही पोस्ट आहे. याचाच अर्थ हा फोटो सिनेमाच्या सेटवरचा आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

फोटोमागचं सत्य
तेजश्रीनं डॉ. प्रकाश बाबा आमटे या सिनेमात डॉ. मंदाकिनी आमटे यांची भूमिका केली होती. तिनं तरूण वयातील मंदाकिनी आमटे साकारली होत्या. याच सिनेमात ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी डॉ. बाबा आमटे यांची भूमिका साकारली होती. तेव्हाचा हा फोटो आहे. आज अनेक वर्षांनी ते सिनेमाच्या अनेक वर्षांनी तेजश्री आणि डॉ. मोहन आगाशे पुन्हा एकत्र आले आहेत. लवकरच ते एका नव्या प्रोजेक्ट मध्ये दिसणार आहेत.