Tauba Tauba Viral Video Aunty: आतापर्यंत तुम्हीही अनेक इन्स्टाग्राम रिल्समध्ये 'तौबा तौबा' गाणं ऐकलं असेल. व्हायरल झालेलं हे गाणं जवळपास दर चौथ्या पाचव्या रिलमध्ये ऐकू येतं असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. खरं तर हे गाणं 'बॅड न्यूज' चित्रपटातील असून या गाण्यावर विकी कौशलने भन्नाट डान्स केल्यामुळे त्याची स्टेप कॉपी करण्याचा जवळपास प्रत्येकजण प्रयत्न करतोय. अनेक नामवंत डान्सर्सपासून नवख्या व्यक्तींपर्यंत बऱ्याच लोकांनी ही स्टेप कॉपी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र एका महिलेने तिच्या मुलांबरोबर या गाण्यावर केलेल्या डान्सचा रिल एवढा व्हायरल झाला आहे की तो थेट विकीपर्यंत पोहोचला आहे. व्हिडीओ पाहून यावर विकी कौशलनेही खास कमेंट केलीय. तो काय म्हणालाय ते पाहूयात...
तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या व्हायरल व्हिडीओला जवळपास 6 कोटी 20 लाख व्ह्यूज आहेत. या व्हिडीओमध्ये नाचाणाऱ्या महिलेचं नाव रुपाली सिंग असं असून ती एक कंटेट क्रिएटर आहे. रुपालीची परिस्थिती अगदीच बेताची असल्याचं तिच्या अनेक व्हिडीओमधून दिसून येतं. मात्र कंटेटच्या जोरावर कोणीही सेलिब्रिटी होऊ शकतो. याच मूर्तीमंत उदाहरण म्हणजे रुपाली आहे. या व्हिडीओमध्ये रुपाली पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे. रुपाली ही एका छोट्याशा गावात राहते आणि आपल्या घराच्या अंगणामध्ये वेगवेगळ्या गाण्यांवर डान्सचे रिल शूट करुन पोस्ट करत असते.
रुपालीने 'तौबा तौबा' गाण्यावर रिल तयार करुन विकीने ओरिजनल गाण्यामध्ये ज्या स्टेप्स केल्या आहेत त्या अगदी हूबेहूब पद्धतीने केला. रुपालीने केलेल्या स्टेप्स पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. रुपालीच्या बाजूला नाचाणाऱ्या दोन्ही चिमुकल्यांनीही बऱ्यापैकी ओरिजनल स्टेप्स कॉपी केल्याचं दिसत आहे.
नक्की वाचा >> 'मी तुला ड्रॉप करतो असं अजयने म्हटलं की मला भिती वाटते कारण...'; तब्बूचा खुलासा
या व्हिडीओला 33 लाखांहून अधिक लाईक्स असून त्यावर 55 हजारांहून अधिक कमेंट्स आहेत. तुम्हीच पाहा हा व्हायरल झालेला व्हिडीओ...
रुपालीचा हा डान्स पाहून चक्क विकी कौशलनेही प्रतिक्रिया नोंदवली आहे. विकीने या पोस्टवर आश्चर्यचकित होऊन, Wow अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे. विकीच्या या प्रतिक्रियेलाही 52 हजारांहून अधिक लाइक्स मिळालेत.
रुपालीच्या अकाऊंटवर 81 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. आता तिच्या फॉलोअर्सची संख्या अजून वाढण्याची शक्यता तिचा व्हिडीओ पाहणाऱ्यांकडून कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त केली जात आहे.