Abhishek Bachchan Shared First Post After Liking Divorce Post : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची जोडी चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. या दोघांची जोडी ही बॉलिवूडमधील परफेक्ट कपलच्या लिस्टमध्ये गणण्यात येते. या सगळ्यात अभिषेक आणि ऐश्वर्या त्यांच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. दोघांमध्ये मतभेद सुरु असल्याचं सोशल मीडियावर म्हटलं जात आहे. त्याची पुन्हा एकदा चर्चा होण्याचं कारण म्हणजे अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नात अभिषेक आणि ऐश्वर्या एकत्र आले आहेत. त्यानंतर अभिषेकनं घटस्फोटाच्या एका पोस्टला लाइक केलं तर चाहत्यांना आश्चर्य झालं. मात्र, त्यानंतर हे देखील स्पष्ट झालं की त्यानं ती पोस्ट लाइक का केली होती. अशात आता अभिषेकनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमुळे वेगळीच चर्चा रंगली आहे.
नात्यात दुरावा येत असलेल्या या चर्चांमध्ये अभिषेक बच्चननं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. खरंतर, अभिषेकनं जियोसिनेमाचा आगामी चित्रपट 'घुडचढी' चा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला शेअर करण्यासोबतच अभिनेत्यानं संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत अभिषेकनं कॅप्शन दिलं की 'धन्यवाद निधी आणि बिनॉय. तुमच्या आणि या नव्या प्रवासासाठी खूप उत्साहित आहे. टीमला शुभेच्छा.' अभिषेकनं या व्हिडीओला शेअर करत चित्रपटाच्या कास्टला देखील टॅग केलं आहे. तर चित्रपटाचा ट्रेलर खूप व्हायरल होत आहे.
'घुडचढी' या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर पार्थ समथान, खुशाली कुमार, संजय दत्त आणि रवीना टंडन महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटात एक वडील आणि मुलाची कहानी दाखवण्यात आली आहे. तर लक्षवेधी गोष्ट म्हणजे ते दोघे आई आणि मुलीच्या प्रेमात पडतात.
हेही वाचा : अंबानी लग्नसोहळा अजून संपलेला नाही! आता पोस्ट वेडिंगसाठी लंडनमधलं अख्खं 7 स्टार हॉटेल बुक
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत या महिन्यात 12 जुलै रोजी लग्न बंधनात अडकले. त्यांच्या लग्नात देखील अनेक बड्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. ऐश्वर्या आणि आराध्या या बच्चन कुटुंबासोबत इथे पोहोचल्या नव्हत्या. इतकंच नाही तर या सगळ्यामुळे अभिषेक आणि ऐश्वर्या विभक्त होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. दरम्यान, याच लग्नातून त्या दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात ते दोघेही आनंदी दिसत होते. त्यामुळे त्या दोघांमध्ये काही मतभेद नाही किंवा ते विभक्त होणार नाही असं म्हटलं जात होतं. अशात खरंच सोशल मीडियावर सुरु असलेली चर्चा ही अफवाह आहे की काय अशी चर्चा रंगू लागली आहे.