मुंबई : गेली अनेक वर्ष रसिकांच्या मनावर राज्य करणारी मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा'. या मालिकेतील प्रत्येक पात्राचं खास आहे. डॉ. हंसराज हाथी हे त्यापैकी एक. मात्र ही भूमिका साकारणारे कवी कुमार आझाद यांचे हृद्यविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. मुंबईतील मीरारोड येथील वॉकहार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अचानक झालेल्या निधनामुळे टेलिव्हीजन सृष्टीला मोठा झटका लागला आहे. तर तारक मेहता मधील कलाकारांना जबर धक्का बसला आहे. कवी कुमार यांच्या आकस्मिक निधानानंतर त्यांचे सहकलाकार दिलीप जोशी म्हणजेच जेठालाल यांना धक्का बसला आहे. सध्या दिलीप जोशी लंडनमध्ये आहेत. ही बातमी कळल्यानंतर त्यांना त्यावर विश्वास ठेवणे खूप कठीण झाले. यावर अभिनेता दिलीप जोशी म्हणाले की, मी लंडनमध्ये असताना मला ही बातमी कळली. पण माझा त्यावर विश्वासच बसत नव्हता की खरंच असं झालं आहे का?
तर आत्माराम भिडेची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या मंदार चंडवाडकर यांनी स्पॉटबॉयशी बोलताना सांगितले की, या कवी कुमारच्या निधनाची बातमी ही कोणत्याही धक्काहुन कमी नव्हती. खरंतर आम्ही एकत्र शूटिंग करणार होतो तेव्हा कळलं की त्यांची तब्बेत बिघडली आहे. तेव्हा त्यांना आराम करू द्यावा व त्यांच्याशिवायच शूटिंग पूर्ण करण्याचा टीमने निर्णय घेतला.
Team #TMKOC & #NeelaTeleFilms regrets to inform about the loss of ur beloved Kavi Kumar Azaad aka @DrHaathi_TMKOC. He was a talented actor with an optimistic personality who never missed a chance to make people smile. Thank you for all the fun-filled laughter memories #RIPDrHathi pic.twitter.com/90REKDNlTI
— TMKOC (@TMKOC_NTF) July 9, 2018
मंदार चंदवाडकर यांनी सांगितले की, मला तर अजूनही विश्वास बसत नाही की ते आमच्यात नाहीत. आम्ही एकत्र असायचो, बोलयचो, खायचो. आम्ही भेटल्यावर गुड मॉर्गिंगच्याही आधी 'टिफिन में क्या लाया है? असे ते विचारत असतं. त्यांना खऱ्या आयुष्यातही खाण्याची आवड होती. त्यांची जागा कदाचित कोणी घेऊ शकेल.