मुंबई : केवळ 16 वर्षांची असताना आपल्यावर बलात्कार झाल्याचा खुलासा लेखिका, अभिनेत्री आणि प्रसिद्ध भारतीय मॉडेल पद्मलक्ष्मी हिनं न्यूयॉर्क टाइम्सच्या एका लेखाद्वारे केलाय. यामुळे पुन्हा एकदा पद्मलक्ष्मी चर्चेत आलीय... याआधीही पद्मलक्ष्मी बऱ्याचदा चर्चेत आली होती... सलमान रश्दी आणि पद्मलक्ष्मी यांचा विवाह आणि घटस्फोटही बराच चर्चिला गेला होता.
पद्मलक्ष्मी हिनं प्रसिद्ध कादंबरीकार सलमान रश्दी यांच्यासोबत 2004 मध्ये न्यूयॉर्कमध्ये विवाह केला होता... दोघांची पहिली भेट 1999 मध्ये झाली होती. या विवाहाची बरीच चर्चाही झाली होती. कारण विवाहावेळी सलमान रश्दी 51 वर्षांचे होते आणि पद्मलक्ष्मी केवळ 28 वर्षांची... तिसऱ्या पत्नीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर सलमान रश्दी यांनी हा विवाह केला होता. परंतु, हा विवाह जास्त दिवस टिकला नाही. जुलै 2007 मध्ये दोघांनी परस्पर समतीनं घटस्फोट घेतला.
घटस्फोटानंतर पद्मलक्ष्मीनं एका मुलाखती दरम्यान घटस्फोटाचं कारणही जाहीर केलं होतं. मी त्यांच्यासोबत राहण्याचा खूप प्रयत्न केला... परंतु, सलमान यांच्यासोबतच्या शारीरिक संबंधांचा अनुभव खूपच त्रासदायक होता. जेव्हा मी त्यांना मनाई करत असेल तेव्हा त्यांना मी 'कारणं देतेय' असं वाटत होतं. यामुळे मला शारीरिक अंतर्गत आजारालाही सामोरं जावं लागलं... त्यामुळे मला पाच तासांची सर्जरी करावी लागली, असं पद्मलक्ष्मीनं म्हटलं होतं.
सलमान यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर पद्मलक्ष्मी हिनं प्रिन्सेस डायना हिचा फायनान्सर थियोडोर टेडडी फोर्स्टमॅन यांना डेट केलं... 2011 साली 71 व्या वर्षी टेडचं निधन झालं... दोघांची एक मुलगी - कृष्णा आहे...
अमेरिकन टीव्ही पर्सनॅलिटी, लेखिका, अभिनेत्री आणि प्रसिद्ध भारतीय मॉडेल पद्मलक्ष्मी एक मोठा खुलासा केला आहे. पद्मलक्ष्मी ही लेखक सलमान रूश्दी यांची पत्नी असून त्यांचा आता घटस्फोट झाला आहे. पद्मलक्ष्मीने केलेला हा मोठा खुलासा न्यूयॉर्क टाइम्सच्या लेखात प्रकाशित केला आहे. त्यावर तिने प्रश्न उभा केला आहे की, का महिलांना त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत गप्प बसावं लागतं?
जेव्हा मी 16 वर्षांची होते तेव्हा मी एका मुलाला डेट करायला सुरूवात केली होती. ज्याला मी लॉस एंजलीसच्या मॉलमध्ये भेटली होती. तिथे मी माझ्या शाळेनंतर काम करत होती. असं पद्मलक्ष्मीने सांगितलं. पुढे ती म्हणाली की, त्याने फ्लर्ट करायला सुरूवात केली. तो 23 वर्षांचा असून कॉलेजमध्ये होता आणि तो अतिशय हँडसम आणि चार्मिंग होता.
एकमेकांना डेट केल्यानंतर काही महिन्यांनी 31 डिसेंबरला त्याने माझ्यावर बलात्कार केला होता. 31 डिसेंबरच्या संध्याकाळी आम्ही नवीन वर्षाच्या पार्टीकरता गेलो होते. मी त्या दिवशी खूप थकले होते आणि त्याच्याच घरी झोपले. पुढे पद्मलक्ष्मी म्हणाली की, मी त्या दिवशी नशेत देखील नव्हते. मी तेव्हा ड्रेस ही तोकडा घातला नव्हता. तरीही माझ्यावर तो बलात्कार झाला.