Tarak Mehta Ka Ulta Chashma : आतातरी पोपटलाल लग्न करणार का? पाहा कोण आहे 'ही' नवी अभिनेत्री?

Tarak Mehta Ka Ulta Chashma News : तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील पोपटलाल याचं आता तरी लग्न होणार का? या मालिकेत आता नवीन कोणत्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: Jan 24, 2024, 11:33 AM IST
Tarak Mehta Ka Ulta Chashma : आतातरी पोपटलाल लग्न करणार का? पाहा कोण आहे 'ही' नवी अभिनेत्री?  title=

Tarak Mehta Ka Ulta Chashma News In Marathi : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका आज घराघरात पोहोचली आहे. गेल्या 15 वर्षापासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. गेल्या काही महिन्यांत अनेक कलाकारांनी या मालिकेचा निरोप घेतला. या मालिकेत दयाबेन कधी परतणार? अशा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे. 

तर दुसरीकडे मालिकेतील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पोपटलालचं लग्न कधी होणार? या मालिकेत पोपटलाल हा बॅचलर आहे आणि अनेक वर्षांपासून लग्नाची वाट पाहत आहे पण त्याला मुलगी सापडत नाही. अनेकवेळा तो मालिकत वेगवेदळ्या मुलींच्या प्रेमात पडला  पण तरीही कोणत्या ना कोणत्या कारणाने तो लग्न करु शकला नाही. मात्र आता तरी नवीन अभिनेत्रींच्या एन्ट्रीमुळे पोपटलालचं लग्न होणार की नाही? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

'तारक मेहता का उल्टा चष्मा'  या मालिकेत एका अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. पूजा शर्मा असं या अभिनेत्रीचं नाव असून पूजाच्या एन्ट्रीमुळे पोपटलालच्या आयुष्यात बऱ्याच घडामोडी घडताना दिसणार आहे. पूजा शर्माने पिंकविलाशी शोमधील तिच्या एंट्री आणि व्यक्तिरेखेबद्दल सांगितले आहे. पूजाने खुलासा केला की, संयोजकाने तिला कॉल करून उल्टा चष्मामधील तारक मेहताच्या भूमिकेबद्दल विचारले. त्याने पूजाला सांगितले की हो, त्याने पाच ते सहा भागांचा  कॅमिओ असेल आणि पूजा म्हणाली की तिने कॅमिओ केला नसता, पण तारक मेहता का उल्टा चष्मा होता म्हणून तिने होकार दिला. 

पूजाने पुढे सांगितले की, तिने ऑडिशन दिले आणि लगेच तिची निवड करण्यात आल्याचे तिने सांगितले. पूजाने पुढे सांगितले की, श्याम पाठक उर्फ ​​पोपटलालने तिला शोमध्ये खूप मदत केली. ती म्हणाली की जेव्हा ती श्याम पाठकला यांना पहिल्यांदा भेटली तेव्हा अभिनेत्रीने तिला सांगितले की तिने कधीही कॉमेडीमध्ये काम केले नाही आणि श्यामला तिला मार्गदर्शन केल्याचे सांगितले. श्याम पाठक यांनी तिला मदत केली आणि शोमध्ये कसं काम करतात याबद्दल माहिती दिली.