हे माँ माताजी... मालिकेला राम राम ठोकल्यानंतरही Disha Vakani कोट्यवधींची मालकीण

'तारक मेहता..', फेम 'दयाबेन' कोट्यवधींची मालकीण, तिची संपत्ती जाणून तुम्हीही व्हाल अवाक्  

Updated: Aug 17, 2022, 10:17 AM IST
हे माँ माताजी... मालिकेला राम राम ठोकल्यानंतरही Disha Vakani कोट्यवधींची मालकीण title=

मुंबई : टेलिव्हिजनच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री दिशा वकानी (Disha Vakani)  आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. दिशाने चित्रपट आणि टीव्ही विश्वात अभिनयाच्या जोरावर ठसा उमटला आहे. गेल्या 5 वर्षांपासून दिशा 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेपासून दूर असली तरी, तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. मालिकेत दया बेनची भूमिका साकारून ती घराघरात लोकप्रिय आहे. आता दिशा मालिकेत काम करत नसली तरी अभिनेत्री कोट्यवधींचा मालक आहे. तिची संपत्ती जाणून तुम्हीही अवाक् व्हाल. 

करोडोंची संपत्ती
एका वृत्तानूसार दिशा वकानीची एकूण संपत्ती करोडोंमध्ये आहे. कारण तिला शो दरम्यान खूप मोठी फी दिली जात होती. 'TMKOC'साठी प्रति एपिसोड 1 ते 1.5 लाख, आणि 2017 मध्ये सुमारे रु. दरमहा 20 लाख एवढी होती. दिशाची टीव्ही प्रेक्षकांमध्ये लोकप्रियता वाढल्यानंतर याची तिला टीव्ही जाहिराती आणि ब्रँड एंडोर्समेंटमध्ये मदत झाली. आजपर्यंत, अभिनेत्रीची एकूण संपत्ती 5 दशलक्ष डॉलर्स किंवा भारतीय चलनात 37 कोटी आहे. ती बीएमडब्ल्यू प्रीमियम ऑटोमोबाईलसारख्या महागड्या कारचं कलेक्शनही तिच्याकडे आहे.

चित्रपटांमध्येही काम केलं
तिच्या प्रसिद्ध टीव्ही शो व्यतिरिक्त, ती अनेक टीव्ही शो आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसली आहे. दिशाने  'देवदास', 'मंगल पांडे: द राइजिंग', 'जोधा अकबर', 'सी कम्पनी', 'लव स्टोरी 2050' आणि इतर अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ती 'खिचडी', 'हीरो भक्ती ही शक्ती है', 'आहट' आणि इतर सारख्या टेलिव्हिजन शोमध्ये दिसली आहे.

2015 मध्ये लग्न झालं
दिशा वकानी ही एक अभिनय पदवीधर आणि थिएटर आर्टिस्ट आहे जिने 2015 मध्ये मयूर पडियाशी लग्न केलं आणि नोव्हेंबर 2017 मध्ये तिला पहिला मुलगा झाला.