तारक मेहताचा असित मोदींना जबरदस्त झटका! शैलेश लोढा यांना द्यावी लागणार 1 कोटींची नुकसान भरपाई

 'तारक मेहता का उल्टा चश्मा' हा  टीव्ही इंडस्ट्रीमधील सर्वात पॉप्युलर शो आहे. या मलिकेने नुकतीच 15 वर्ष पूर्ण केली आहेत.  सध्या ही मालिका विविध कारमांमुळे चर्चेत आहे. 

Updated: Aug 5, 2023, 05:52 PM IST
तारक मेहताचा असित मोदींना जबरदस्त झटका! शैलेश लोढा यांना द्यावी लागणार 1 कोटींची नुकसान भरपाई title=

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही छोट्या पदड्यावरील सर्वात लोकप्रिय मालिका सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेच आहे.या मालिकेतील अनेक कलाकारांनी  विविध कारणांमुळे ही मालिका सोडली आहे. मालिकेचे निर्माते असित मोदी यांच्यावर अनेक कलाकारांनी गंभीर आरोप केले. माहिलेतील मुख्य पात्र अर्थात अभिनेता शैलेश लोढा यांनी तर असित मोदी यांना कोर्टात खेचले होते. ही कायदेशीर लढाई अभिनेता शैलेश लोढा यांनी जिंकली आहे. यामुळे असित मोदी यांना जबरदस्त झटका बसला असून, शैलेश लोढा यांना 1 कोटींची नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. 

शैलेश लोढा आणि असित मोदी यांच्यात नेमका काय वाद झाला?

2022 मध्ये शैलेश लोढा यांनी  'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही मालिका सोडली.  'तारक मेहता का उल्टा चश्मा' शो चे सर्व कलाकर तसेच चाहत्यांसाठी हा मोठा धक्का होता. शैलेश लोढा यांनी कधीही माहिला सोडण्याबद्दल उघडपणे भाष्य केले नाही. मात्र, निर्मात्याने अनेक कलाकारांचे मनधन अडवले होते. तसेच माध्यमांशी बोली अशी अनेक बंधने घातली होती. यामुळेच  शैलेश लोढा  आणि निर्माते असित मोदी यांच्यात वाद सुरु होता. मानधन देण्याच्या बदल्यात काही काही कागदपत्रांवर सही करावी अशी निर्माते असित मोदी यांना शैलश लोढा यांना घातली होती. कागपत्रामध्ये नमूद केलेला एकही मुद्दा शैलेश लोढा यांना पटला नाही. यानंतर शैलश लोढा यांनी असित मोदी यांना थेट कोर्टात खेचले.

तीन वर्षांपासून थकवले होते कलाकारांचे मानधन

असित मोदी यांनी तीन वर्षांपासून  'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेतील अनेक कलाकारांचे मानधन थकवले होते. कलाकार वारंवार प्रोडक्शन हाऊस तसेच  असित मोदी यांच्याकजे मानधन मागत होते. मात्र, त्यांना कोणताच प्रतिसाद मिळलाा नाही अखेरीस शैलेश लोढा यांना या मुद्दा उचलून धरला आणि राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण अर्थात NCLT कडे (National Company Law Tribunal) तक्रार दाखल केली. यानंतर कलाकारांचा मानधन थकवल्याचा मुद्दा मीडियामध्ये देखील चर्चेच आला. यानंतर  असित मोदी यांनी कलाकारांचे थकलेले मानधन देण्यास सुरुवात केली. शैलेश लोढा यांनी  NCLT कडे तक्रार दाखल केल्यानंचर कायदेशीर लढाई जिंकली आहे. यानंतर कोर्टाने असित मोदी यांना शैलेश लोढा यांचे 1 कोटी 5 लाख 84 हजार रुपयांचे  थकलेले मानधन देण्याचे आदेश दिले आहेत.