JNU हिंसाचारावर सेलिब्रिटींची प्रतिक्रिया

जेएनयू हिंसाचाराचे पडसाद देशभर 

Updated: Jan 6, 2020, 08:50 AM IST
JNU हिंसाचारावर सेलिब्रिटींची प्रतिक्रिया  title=

मुंबई : जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी (JNU) मध्ये रविवारी संध्याकाळी जेएनयू विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आइशी घोषवर हल्ला झाला. या हल्यात आइशीच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली आहे. रिपोर्टनुसार, अज्ञातांनी हॉस्टेलमध्ये जाऊन हल्ला केला. जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा दावा आहे की, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीवीपी)ने हिंसाचार केला आहे. तर एबीवीपीने पत्रक जाहिर करून या हल्यामागे डावे विचारांच्या संघटनांचा (SFI, AISA आणि DSF) यांचा हात असल्याच म्हटलं आहे. 

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर या घटनेनंतर खूप त्रस्त दिसली. एक व्हिडिओ शेअर करून तिने आपली भावना व्यक्त केली. या व्हिडिओत स्वरा भास्कर आपल्या भावना रोखू शकली नाही. स्वराने या हल्याचा आरोप एबीवीपीवर केला आहे. स्वराने ट्वीटमध्ये म्हटलं आहे की,'अर्जंट अपील. सगळे दिल्लीकर, बाबा गंगनाथ मार्गावर असलेल्या जेएनयू परिसराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर मोठ्या संख्येने उपस्थित राहा. जेणे करून सरकार आणि दिल्ली पोलीसांवर कारवाई करण्यासाठी दबाव वाढवला जाऊ शकतो. आणि एबीवीपीच्या मास्क घातलेल्या गुंडांनी केलेल्या तोडफोडीला रोखू शकतो.'

स्वराने या ट्विटसोबत एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. यामध्ये ती अतिशय भावूक झाल्याची दिसत आहे. स्वरा म्हणते,'तिचे पालक देखील जेएनयूमध्ये राहतात. हा व्हिडिओ बघून तिला खूप मोठा धक्का बसला आहे.'

यासोबतच तापसी पन्नूने देखील यावर ट्विट केलं आहे. तापसीने देखील असा दावा केला आहे की एबीवीपीच्या लोकांनीच विद्यार्थ्यांवर हल्ला केला. 'जिथे विद्यार्थ्यांच भविष्य बनवलं जातं त्या जागेची अशी अवस्था केली. याचं दुःख कायमच राहणार. कधीच भरून न निघणारी गोष्ट आहे. ही अतिशय दुःखद गोष्ट.'

यासोबतच अनेक बॉलिवूड कलाकारांनी ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यामध्ये गौतम गंभीर, जावेद जाफरी, विशाल ददलानीचा समावेश आहे

गौतम गंभीर म्हणतो की,'विद्यापीठात असा हल्ला करणं हे देशाच्या नीतिशास्त्राविरोधात आहे.' या हल्ल्याचे पडसाद आता देशभर पसरत आहेत. मोठ्या संख्येत विद्यार्थी या हिंसाचाराचा विरोध करत आहेत. जेएनयूच्या विद्यापिठाच्या परिसरात झालेल्या या हल्ल्याचा निषेध केला जात आहे.