तापसीकडून लहान बहिणीला 'अनमोल' गिफ्ट

लहान बहिणीसाठी तापसीचं खास गिफ्ट

Updated: Jul 18, 2019, 06:24 PM IST
तापसीकडून लहान बहिणीला 'अनमोल' गिफ्ट title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या आगामी 'सांड की आँख' चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र सध्या तापसीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. तापसीने तिच्या बहिणीच्या वाढदिवशी तिला दिलेल्या एका खास गिफ्टचा व्हिडिओ शेअर केला आहे. तापसीने तिची बहिण शगुन पन्नू हिला तिच्या वाढदिवशी एक महागडी 'जीप कंपास एसयूव्ही' भेट दिली आहे. हा व्हिडिओ तापसीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये तापसीने, लहानपणापासून शगुनला माझ्याच वापरलेल्या वस्तू मिळत असल्याचं सांगतिलं. त्यामुळे यावेळी मी तिला हे गिफ्ट दिलं असल्याचं तिने म्हटलंय. व्हिडिओमध्ये तापसी तिच्या बहिणीच्या डोळ्यांवर हात ठेऊन तिला घेऊन येते. कार पाहताच तिच्या बहिणीला झालेला आनंद तापसीने शेअर केला आहे.

 
 
 
 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee) on

जीप कंपास एसयूव्हीची किंमत २१.३३ लाख इतकी आहे. ही गाडी सप्टेंबरमध्ये एसयूवी ओ ट्र‍िमच्या जागी लॉन्च करण्याच आली होती. या जीप कंपासमध्ये ५०हून अधिक सेफ्टी आणि सिक्योरिटी फीचर्स आहेत.

तापसी आगामी 'सांड की आँख' आणि 'मिशन मंगल'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.