'हा' तुला दुबईत विकून टाकेल! तापसी पन्नूला कुणी केलं होतं बॉयफ्रेंडविषयी सतर्क

Taapsee Pannu : तापसी पन्नूनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या नवऱ्याविषयी अर्थात बॉयफ्रेंडविषयी कोणी काय सल्ला दिला होता याचा खुलासा केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Aug 9, 2024, 04:04 PM IST
'हा' तुला दुबईत विकून टाकेल! तापसी पन्नूला कुणी केलं होतं बॉयफ्रेंडविषयी सतर्क title=
(Photo Credit : Social Media)

Taapsee Pannu : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूनं याच वर्षी बॉयफ्रेंड माथियास बोशी लग्न केलं. तापसी जेव्हा रिलेशनशमध्ये होती तेव्हा ती तिच्या खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत होती. आता लग्नानंतर तापसी तिच्या नवऱ्याविषयी बोलताना दिसते. आता तापसीनं सांगितलं की ती जेव्हा पहिल्यांदा माथियाजला भेटली तेव्हा तिच्या मित्र-मैत्रिणींनी तिला चेतावनी दिली. त्यावेळी तापसी भारतात आणि माथियाज डेनमार्कमध्ये होता. त्यावेळी तापसीचे मित्र-मैत्रिणी हे तिच्या सुरक्षेला घेऊन चिंतेत होते. याविषयी तापसीनं एका मुलाखतीत सांगितलं आहे. 

तापसीनं रौनक राजानीच्या रिलेशनशिप एडव्हाइसमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी तापसी म्हणाली, 'आम्ही 10-11 वर्षांपूर्वी भेटलो होतो आणि मग त्यानं 1 वर्षानंतर प्रपोज केलं. खरंतर ते प्रपोजल खूप लवकर होतं. साखरपुडा होऊन 9 वर्ष झाली आमच्यात कोणतीही अडचण नव्हती. आम्हाला अजूनही याच विश्वासावर होतो की आयुष्यभर एकत्र राहू.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

पुढे तापसीला विचारण्यात आलं की 'तिनं तिच्या आयुष्यात क्रेझी असं काय केलं आहे. तेव्हा तिनं सांगितलं की जेव्हा आम्ही पहिल्या डेटवर गेलो होतो तेव्हा त्यानं मला प्रपोज केलं आणि सांगितलं की त्याला मला डेनमार्क किंवा मग दुबईमध्ये डेटवर घेऊन जायचं आहे. कारण ती दोन ठिकाणंच त्याला चांगल्या पद्धतीनं माहित आहेत. तर मी म्हटलं की डेनमार्कला कोण जाणार? '

तापसीनं पुढे सांगितलं की 'मी विचार करत होते की या व्यक्तीला माझ्यात इतका का इंट्रेस्ट आहे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही दोघंही असे वेगळ्या जगातील लोकं. तो परदेशी व्यक्ती आणि त्याला माझ्यात का इंस्ट्रेस्ट असेल. तर जेव्हा मी गेले तेव्हा माझ्या मित्र-मैत्रिणींनी मला लक्ष ठेव असा सल्ला दिला. नाही तर कळेल की त्यानं तुला शेखकडे विकलं. मी मस्करी करत नव्हते. माझी बेस्ट फ्रेंड आहे तिनं मला दुबईत राहणाऱ्या तिच्या बहिणीचा नंबर देखील दिला की काही मदतीची गरज असेल तर त्या नंबरवर फोन कर. पण माथियाज चांगला माणूस निघाला. त्यानं मला विकलं नाही. हेच कारण होतं की 10-11 वर्ष गेले. मी अजूही अनेक वर्ष असे राहणार आहे.' 

हेही वाचा : राजेश खन्नाची पत्नी होणं खूप त्रासदायक होतं! डिम्पल कपाडिया स्पष्टच बोलली...

तापसीच्या कामाविषयी बोलायचं झालं तर ती आता आई हसीन दिलरूबा या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत विक्रांत मेसी आणि सनी कौशल महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यासोबत ती खेल खेलमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अक्षय कुमार, वाणी कपूर, एमी विर्क आणि फरदीन खान महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.