#MeToo लैंगिक शोषण प्रकरणात जोडलं आणखी एक नाव

त्यावर हे महाशय म्हणतात...

Updated: Oct 13, 2018, 10:31 AM IST
#MeToo लैंगिक शोषण प्रकरणात जोडलं आणखी एक नाव title=

मुंबई: #MeToo या चळवळीअंतर्गत बऱ्याच महिलांनी आपल्यावर झालेल्या लैंगिक शोषणाविषयीच्या प्रसंगांना वाचा फोडली आहे. या साऱ्यामध्ये आता आणखी एका प्रसिद्ध व्यक्तीवर लैगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. मुख्य म्हणजे या प्रकरणाला जास्तच हवा मिळत असतानाच त्या व्यक्तीचं नाव पुढे आल्यामुळे आता आणखी एका विषयाला चालना मिळत असल्याचं स्पष्ट होत आहे.

एका निनावी ट्विटच्या माध्यमातून टी सीरिजचे अध्यक्ष भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला आहे. शुक्रवारी याविषयीची माहिती सर्वांसमोर उघड झाली. 

आपल्यावर करण्यात आलेल्या या आरोपांवर कुमार यांनी प्रतिक्रिया देत या आरोपांचं खंडन केलं आहे. 

'या #MeToo प्रकरणात आपलं नाव गोवलं गेल्यामुळे मी खूपच अस्वस्थ झालो आहे. माझ्यावर करण्यात आलेले सर्वच आरोप अगदी चुकीचे आहेत. मी नेहमीच इतरांशी आदराने वागलो असून, आपल्या मर्यादा जाणल्या आहेत. कामात गरजेच्या असणाऱ्या निकषांवरच मी नेहमी भर दिला आहे', असं म्हणत आपल्यावर आरोप करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल करत असल्याचं त्यांनी सांगितलं. 

bhushan kumar accused of sexual misconduct

कुमारविरोधात करण्यात आलेल्या त्या ट्विटनंतर लगेचच हे अकाऊंट डिलीटही करण्यात आलं. त्यामुळे या प्रकरणी आता कायदेशीर पावलं उचलणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.