'राम जन्मभूमी' चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची परवानगी

'राम जन्मभूमी' चित्रपट २९ मार्च रोजी संपूर्ण देशात प्रदर्शित होणार आहे

Updated: Mar 16, 2019, 11:21 AM IST
'राम जन्मभूमी' चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची परवानगी title=

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोर्डचे अध्यक्ष सैय्यद वसीम रिजवीद्वारा अयोध्येतील राम मंदिरावर चित्रित करण्यात आलेल्या 'राम 'राम जन्मभूमी' या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणित करण्यात आलं आहे. चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाचे सर्टिफिकेट मिळाले आहे. चित्रपटाला सर्टिफिकेट मिळाल्यानंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 'राम जन्मभूमि' चित्रपट २९ मार्च रोजी संपूर्ण देशात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा वसीम रिजवी यांनी लिहीली असून चित्रपटाची निर्मीतीही वसीम यांनी केली आहे. 

'राम जन्मभूमी' चित्रपटात राम मंदिर आंदोलनासंबंधी विविध घटनांचा समावेश केला आहे. अयोध्येतील अनेक महत्त्वपूर्ण ठिकाणांवर या चित्रपटाचे चित्रिकरण करण्यात आले आहे. सनोज मिश्रा दिग्दर्शित 'राम जन्मभूमी' चित्रपटात मनोज जोशी, गोविंद नामदेव, नायनीज पाटनी आणि राजवीर सिंह प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 

यदि मदरसे बंद नहीं हुए तो आधे से ज्'€à¤¯à¤¾à¤¦à¤¾ मुस्लिम ISIS समर्थक हो जाएंगे: वसीम रिजवी

'राम जन्मभूमी'चं पहिलं पोस्टर आणि टीझर प्रदर्शित झाल्यानंतर त्यांना अनेक धार्मिक संघटनांकडून कायदेशीर कागदपत्रांसह तसंच अंडरवर्ल्डकडूनही चित्रपट प्रदर्शित न करण्यासाठी अनेक धमक्या आल्या असल्याचं रिजवी यांनी सांगितलं.

याआधी रिजवी यांनी राम मंदिर मुद्द्यावरून अशी विधानं केली आहेत ज्यामुळे मुस्लिम समाजाने त्यांचा तीव्र विरोध केला होता. नोव्हेंबर २०१८ मध्येही वसीम यांनी सरकारला हिंदू मुस्लिम वाद शांत करण्यासाठी एक फार्मुला लेटर लिहिले होते. यानंतरही वसीम चर्चेत आले होते.