Ankita Lokhande's Fees for Swatantrya Veer Savarkar : बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा आणि अंकिता लोखंडेचा 'स्वातंत्र्य वीर सावरकर' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट 22 मार्च रोजी शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील त्या दोघांची भूमिका आणि त्यातल्या त्या त्या दोघांना अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. या चित्रपटात अंकितानं यमुनाबाई यांची भूमिका साकारली आहे. अंकिताची या चित्रपटात फार मोठी भूमिका अर्थात ती या चित्रपटात जास्त वेळ स्क्रिनवर दिसली नसली तरी तिच्या अभिनयाची जादू सगळ्यांना पाहायला मिळाली आहे. जेव्हा पासून या चित्रपटाची घोषणा झाली तेव्हा पासून या कलाकारांनी किती मानधन घेतलं याची देखील चर्चा सुरु झाली होती. आता निर्मात्यांनी अंकितानं या चित्रपटासाठी किती मानधन घेतलं याचा खुलासा केला आहे.
अंकिताला या भूमिकेत पाहून प्रेक्षकांना आश्चर्य झालं आहे. तिच्या चाहत्यांच्या यादीत आणखी लोकांची संख्या वाढली आहे. अंकितानं तिच्या करिअरमध्ये निवडलेल्या वेगवेगळ्या भूमिका निवडण्याविषयी 'आयएएनएस' या न्यूज एजंसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की "अशा भूमिका सामान्यपणे माझ्याकडे स्वत: हून येतात. मी मुद्दामून अशा भूमिका निवडत नाही." तर चित्रपटाचे निर्माता संदीपनं सांगितलं की "ती हाय कॅलिबरची अभिनेत्री आहे आणि त्यासाठी तिला अशा दमदार भूमिका मिळतात."
निर्माते संदीप म्हणाले की "आमच्यासारख निर्माते किंवा एकता कपूर, कंगना किंवा कमल जैन आम्हाला सगळ्यांना माहित आहे की एक कलाकार म्हणून तिच्याकडे कोणती क्षमता आहे. त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या भूमिका घेऊन येतो."
निर्मात्यांनी सांगितलं की "अंकितानं चित्रपटासाठी मानधन घेतलं नाही.' तर अंकिता म्हणाली "संदीप माझे खूप चांगले मित्र आहेत. तो हा चित्रपट घेऊन माझ्याकडे आला. चित्रपटाच्या बजेटमुळे तो आधीत चिंतेत होता, मी त्याची साथ दिली."
हेही वाचा : IPL 2024 सिगारेट पिताना कॅमेऱ्यात कैद झाला शाहरुख खान! VIRAL VIDEO मुळे एकच चर्चा
या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसविषयी बोलायचे झाले तर चित्रपटानं ओपनिंग डेला 1.15 कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 2.25 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे आता विकेंड आणि त्यातल्या होळीची सुट्टी पाहता चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये चांगलीच वाढ होईल अशी आशा निर्मात्यांना आहे.