प्राजक्ता गायकवाडनं घेतलं नवं घर, सत्यनारायणाच्या पूजेचा Video केला शेअर; नेटकरी म्हणाले...

Prajakta Gaikwad Buys New Home: 'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिनं नुकतंच एक घर घतलं असून त्याचे फोटोज आणि व्हिडीओ (Satyanarayan Puja Video Prajakta Gaiwad) इन्टाग्रामवर शेअर केले आहेत. यावेळी तिनं सत्यनारायणाच्या पूजेचे काही क्षण शेअर केले आहेत. सध्या हे फोटोज सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. 

गायत्री हसबनीस | Updated: May 14, 2023, 08:41 PM IST
प्राजक्ता गायकवाडनं घेतलं नवं घर, सत्यनारायणाच्या पूजेचा Video केला शेअर; नेटकरी म्हणाले... title=
Prajakta Gaikwad | Instagram

Prajakta Gaikwad Home: सोशल मीडियावर टेलिव्हिजनवरील अनेक कलाकार हे सक्रिय असतात आणि आपल्या आयुष्यातील यशस्वी वाटचाल हे आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात. घर घेणं हे आपल्यापैंकी प्रत्येकाचेच स्वप्न असते असंच स्वप्न साकार केले आहे 'स्वराज्यरक्षक संभाजी' या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री यसूबाई म्हणजेच प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad Instagram) हिनं. सेलिब्रेटीही आपल्या घराचे स्वप्न साकार करताना दिसतात आणि आपल्या नव्या घराचे फोटो हे सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसतात. 

प्राजक्ता गायकवाडही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. तिचं सोशल मीडियावरील फॅन फॉलोइंगही प्रचंड आहे. इन्टाग्रामवर तिचे लक्षवेधी फॉलोवर्स आहेत. आपल्या इन्टा अकांऊटवरून एक गोड बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. यावेळी तिनं नवीन घरातील सत्यनारायणपुजेचा (Satyanarayan Puja Video Prajakta Gaiwad) व्हिडीओ पोस्ट केला आहे. काही दिवसांपुर्वीच प्राजक्ता गायकवाडनं एक नवं घरं घेतलं आहे. सोबतच या व्हिडीओ नव्या घरातील गृहप्रवेशाचे काही क्षण प्राजक्तानं शेअर केले आहेत. (swarajyarakshak sambhaji fame actress Prajakta gaikwad buys new home shares satyanarayan puja photos and video on instagram)

यावेळी तिनं केशरी आणि पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली आहे. ती या व्हिडीओमध्ये (Video) खूपच खुलून दिसते आहे. यावेळी तिनं पांढऱ्या रंगाची जरीच्या पैठणीप्रमाणे साडी नेसली आहे. यावेळी ती एकटीच गृहप्रवेश करताना दिसते आहे. ती सत्यनारायणाच्या पूजेला एकटीच बसली असून तिच्या बाजूला पूजेचे विधी करणारे भटजीही बसले आहेत. नंतर आपल्या परिवारासह ती पूजा संपन्न करते. यावेळी प्राजक्तानं केलेला साजशृंगार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. तिनं मोत्याचे दागिनेही घातलेले पाहायला मिळत आहेत व केस मोकळे सोडले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तिच्या या पोस्टवर चाहत्यांच्या अभिनंदनाच्या कमेंट्स येताना दिसत आहेत. अनेकांनी तिला अशीच उत्तमोत्तम प्रगती कर अशा शुभेच्छा दिल्या आहेत.  आपले स्वप्न पुर्ण केल्याबद्दलही अनेकजण तिचे आभार मानताना दिसत आहेत. तिच्या या व्हिडीओला अनेक व्ह्यूज आणि लाईक्स आले आहेत. सोबतच तिनं काही फोटोही शेअर केले आहेत. ज्यातही ती अत्यंत सुंदर आणि देखणी दिसते आहे. 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतील तिची यसूबाईंची भुमिका प्रचंड गाजली होती. त्यानंतरही तिनं अनेक चांगल्या मालिकांमधून कामं केली आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ती इन्टाग्रामवरही खूप सक्रिय असते. मध्यंतरी एका मालिकेवरून तिच्यात आणि अभिनेत्री अलका कुबल यांच्यात वाद निर्माण झाला होता. प्राजक्ता काही कार्यक्रमांनाही हजेरी लावताना दिसते. त्यामुळे तिची अनेक ठिकाणी प्रचंड प्रमाणात चर्चा असते. सध्या तिचे हे फोटोज (Photos) आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.