मुंबई : ३१ डिसेंबरला प्रत्येकाचे खास प्लान असतात. कुणी कुटुंबासोबत वेळ घालवतो तर कुणी परदेश फिरायला जातो. पण एका गायकावर चक्क ३१ डिसेंबरच्या रात्री केळी खाण्याची वेळ आली होती. हा किस्सा गायकाने एका कार्यक्रमात सांगितला आहे.
हल्ली प्रत्येकालाच हटके पद्धतीने ३१ डिसेंबरचे सेलिब्रेशन हवे असते. त्यामुळे ३१ डिसेंबर रोजी गायकाचा बांग्लादेशातील चित्तागाँग (Bangladesh Chattogram) येथे LIVE कार्यक्रम होता.
पण या कार्यक्रमात मिळालेली वागणूक गायक अद्याप विसरलेला नाही. हा गायक आहे. आपला मराठमोळा लोकप्रिय गायक स्वप्नील बांदोडकर. (फडणवीसांच्या घरी फ्रीजलाही असतं लॉक; काय असेल यामागचं कारण?)
स्वप्नील बांदोडकरने मराठीसोबतच बांग्लादेशी गाणी देखील गायली आहेत. त्यामुळे त्याची लोकप्रियता बांग्लादेशमध्ये देखील जास्त आहे.
३१ डिसेंबरच्या रात्री स्वप्नील बांदोडकराचा LIVE कार्यक्रम होता. या कार्यक्रमाकरता त्याला विमानाने ठाका ते चित्तागाँगला जायचं होतं.
पण धुक्यामुळे हे कनेक्टींग विमान रद्द झालं. मात्र दोन तासाचा प्रवास आहे सांगून स्वप्नीलला तब्बल ८ तासाचा प्रवास करून कार्यक्रमाच्या ठिकाणी नेलं.
त्याच रात्री कार्यक्रम होता. स्वप्नीलला एका पाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबवण्यात आलं होतं. मात्र त्या हॉटेलची पॉलिसी होती.
ज्यानुसार रात्री १० नंतर कोणतीही जेवणाची ऑर्डर स्वीकारली जाणार नव्हती. स्वप्नीलचा कार्यक्रम उशीरा संपला.
दिवसभराचा प्रवास, लाईव्ह कार्यक्रम यानंतर स्वप्नील थकला होता. मात्र त्याला हॉटेलच्या पॉलिसीमुळे जेवण मिळालं नाही. तेव्हा त्याला चक्क केळी खाऊन झोपण्याची वेळ आली.
स्वप्नीलने स्वतः झी मराठीवरील 'किचन कल्लाकार' या कार्यक्रमात याची माहिती दिली.