'स्वॅग से स्वागत' हे 'या गाण्याचं' कॉपी आहे व्हर्जन आहे का ?

सलमान खान आणि कॅटरिना कैफ ही जोडी सुमारे 5 वर्षांनंतर रूपेरी पडद्यावर झळकणार आहे.

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Dec 2, 2017, 04:50 PM IST
'स्वॅग से स्वागत' हे 'या गाण्याचं' कॉपी आहे व्हर्जन आहे का ?  title=

 मुंबई : सलमान खान आणि कॅटरिना कैफ ही जोडी सुमारे 5 वर्षांनंतर रूपेरी पडद्यावर झळकणार आहे.

२२ डिसेंबरला 'टायगर जिंदा है' या चित्रपटातून सलमान आणि कॅटरिना रोमान्स आणि सोबतच अ‍ॅक्शन पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. 

 
 युट्युबवर धुमाकूळ 

 
 'टायगर जिंदा है' चित्रपटातील पहिलं गाणं ' स्वॅग से स्वागत' आणि ट्रेलरला युट्युबवर प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. युट्युबवर या चित्रपटाच्या गाण्याने तुफान कामगिरी केली आहे.  

 
 स्वॅग से स्वागत हे खरंच ओरिजनल गाणं आहे का ? 

 
 काही मीडिया रिपोर्टनुसार, 'स्वॅग से स्वागत' हे गाणं डीजे कॅचचं गाणं ' द होन्स' या गाण्यावरून कॉपी करण्यात आलं आहे. या गाण्याचे बीट्स आणि म्युझिक सारखंच वाटत असल्याचं काही रिपोर्टसचं म्हणणं आहे. 

 

सलमान कॅटरिनाचा कूल अंदाज 

'टायगर जिंदा है' चित्रपटातील पहिलं गाणं 'स्वॅग सए स्वागत यामध्ये कॅटरिनाचा कूल अंदाज पाहता येत आहे. तसेच सलमान खान रॅप करताना दिसतोय. या दोघांच्या बरोबरीने काही हटके स्टाईल्सचे जगभरातील सुमारे  १०० डान्सर नाचताना दिसत आहेत. 

विशाल शेखरचं संगीत 

'टायगर जिंदा है' चित्रपटामध्ये ' स्वॅग से स्वागत' हे गाणं  विशाल - शेखर  या जोडगोळीने संगीतबद्ध केलं आहे. सोबतच  विशालने हे गाणं गायलं आहे.