शिल्पा शिंदेचे मराठी कलाकारांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य

 वादग्रस्त वक्तव्य बिग बॉसमध्ये सहभागी असलेल्या शिल्पा शिंदेने केले आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Dec 2, 2017, 03:42 PM IST
शिल्पा शिंदेचे मराठी कलाकारांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य  title=

पुणे : 'बिग बॉस' चे सर्वच सिझन हे भांडण आणि वादग्रस्त वक्तव्यांसाठी लक्षात राहतात. असेच एक वादग्रस्त वक्तव्य बिग बॉसमध्ये सहभागी असलेल्या शिल्पा शिंदेने केले आहे. मराठी कलाकारांच्या स्वभावावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. 

सुरुवातीपासून चर्चेत 

शिल्पा शिंदे सब टीव्हीवरील भाभीजी घर पे हैं या मालिकेत अंगूरी भाभीच्या भूमिकेत दिसलेली शिल्पा शिंदे सध्या बिग बॉसच्या घरात आहे. विकास गुप्तासोबत झालेल्या भांडणांमूळे ती बिग बॉसच्या सुरुवातीपासूनच सर्वांच्या नजरेत राहिली. 

विकास गुप्ता आणि शिल्पा शिंदे एकमेकांशी गप्पा मारताना मराठी कलाकारांचा विषय निघाला. मराठी कलाकारांविषयी बोलताना शिल्पाची जीभ घसरली.

काय म्हणाली शिल्पा ?

“मराठीमध्ये बहुतांश कलाकार चांगले आहेत पण ते गर्विष्ट आहेत. त्यांच्यामध्ये मीपणा जरा जास्त असतो. हे काम मी नाही करणार असा त्यांचा अॅटिट्यूड असतो.

हाच त्यांचा मोठा प्रॉब्लेम आहे. त्यांचा गर्विष्ठपणा साऱ्याच्या आड येतो.”असे वक्तव्य शिल्पाने केले.

सोशल मीडियावर टार्गेट

त्यानंतर विकासने मराठी कलाकार चांगले असल्याचा तसेच मराठी अभिनेत्री सुंदर असल्याचे सांगितले. दरम्यान मराठी कलाकारांच्या मुद्यावरून ती सोशल मीडियावर टार्गेट होत आहे.