Sushmita Sen : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन ही तिच्या 'ताली' या सीरिजमुळे चर्चेत आहे. सीरिजमधील दमदार अभिनय प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. सध्या सुष्मिताच्या करिअरविषयी बोलायचे झाले तर ताली नंतर ती आता 'आर्या 3' या सीरिजमध्ये दिसणार आहे. ओटीटी गाजवणारी सुष्मिता सेनचं खासगी आयुष्य देखील तितकंच चर्चेत असतं. पण तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट माहित आहे का? की सुष्मिता सेननं घेतलेल्या एका निर्णयामुळे तिला तिच्या वडिलांच्या संपत्तीतील एक रुपयाही मिळणार नाही आहे. सुष्मितानं असा कोणता निर्णय घेतला की तिला वडिलांच्या संपत्तीतील एक रुपया मिळणार नाही हे जाणून घेऊया....
सुष्मिता एका मुलाखतीत याविषयी सांगत म्हणाली, मिस युनिव्हर्सचं असल्यानं माझं कर्तव्य पार पाडण्यासाठी मी अनेकदा अनाथा आश्रमांना भेट द्यायची. तेव्हा मला जाणवलं की अशी बरीच मुलं आहेत ज्यांना आईची गरज आहे. त्यावेळी मी ठरवलं होतं की मला मूल दत्तक घ्यायचं आहे. पण माझा हा निर्णय आईला मान्य नव्हता. माझ्या या निर्णयाविषयी जेव्हा तिला कळलं तेव्हा ती खूप चिडली. त्यानंतर माझ्या वडिलांना जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांनी मला प्रश्न विचारला की तुला मूल दत्तक का घ्यायचं आहे? मी म्हटलं की त्याबद्दल माझ्या मनात ती भावना निर्माण झाली आहे.
सुष्मिताचं हे वक्तव्य ऐकताच तिचे वडील म्हणाले की तू हे काही वर्षांनंतरही करू शकतेस. मग त्यावर उत्तर देत मी त्यांना विचारलं की जर माझं लग्न झालं आणि त्यानंतर माझ्या पार्टनरनं या निर्णयाला नकार दिला तर मी काय करायच? तेव्हा मला कोणाला उत्तर द्यायचं नाही. त्यानंतर त्यांनी माझ्या निर्णयाला पाठिंबा दिला.
हेही वाचा : खोटे आकडे सांगत, स्वत: चित्रपटाची तिकिटं खरेदी करतात; 'गदर 2' या दिग्दर्शकांचा निर्मात्यांवर निशाणा
याविषयी सविस्तर सांगत सुष्मिता म्हणाली की कायद्याप्रमाणे, 'मूल दत्तक घेत असताना वडिलांच्या संपत्तीचा अर्धा भाग हा आधीच त्या मुलांच्या नावावर करावा लागतो. त्यात जर वडील नसतील तर एखादी वयस्कर व्यक्ती असायला हवी.' तर अशा वेळी सुष्मिताचे वडील समोर आले. त्यांच्याविषयी बोलत सुष्मिता म्हणाली, 'हे काम करणारी माझ्या वडिलांपेक्षा उत्तम व्यक्ती आणखी कोण असू शकते? माझ्या वडिलांनी अर्धी नाही तर त्यांची संपूर्ण संपत्ती मी दत्तक घेतलेल्या मुलीच्या नावे केली. भारतासारख्या देशात मी अशा वडिलांची मुलगी आहे याचा मला अभिमान आहे असे म्हटले. त्यांनी फक्त माझ्यासाठी नाही तर माझ्या मुलीसाठी जे केलं त्याचा कोणी विचारही करू शकणार नाही.'