#MeToo अभियानाबद्दल सुष्मिता सेनचं मोठं वक्तव्य

काय म्हणाली सुष्मिता 

#MeToo अभियानाबद्दल सुष्मिता सेनचं मोठं वक्तव्य  title=

मुंबई : बॉलिवूडमधील एका पाठोपाठ एक मोठी नावं #MeToo प्रकरणात अडकताना दिसत आहे. तनुश्री दत्ताने अभिनेता नाना पाटेकरांवर आरोप लावले. त्यानंतर आलोकनाथ, सुभाष घई सारख्या ज्येष्ठ व्यक्तींवर देखील आरोप करण्यात आले. यामध्ये आता प्रत्येकजण आपली मत शेअर करत आहेत. मिस यूनिवर्स आणि अभिनेत्री सुष्मिता सेनने देखील या प्रकरणावर आपलं मत शेअर केलं आहे. 

सुष्मिता सेन म्हणते की, लैंगिक अत्याचाराविरोधात #MeToo हे सुरू झालेलं अभियान तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा लोकं पीडित व्यक्तीचं ऐकून घेतील. सुष्मिता सेन ही कायमच आपलं स्पष्ट मत मांडण्यात अतिशय लोकप्रिय आहे. जरी हे अभियान हॉलिवूडपासून सुरू झालं असलं तरीही याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हे ऐकून बरं वाटतं की, महिला आता आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराबद्दल स्पष्ट बोलत आहेत.  

समाजाचा हिस्सा असल्यामुळे लोकांनी पीडित महिलांची गोष्ट ऐकली पाहिजे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हे अभियान तेव्हाच काम करेल जेव्हा पीडित महिलांच लोकं ऐकतील.