EXCLUSIVE: सुशांत सिंहचे बँक अकाऊंट डिटेल्स उघड, पाहा कुणाला किती पैसे दिले...

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात बिहारच्या पाटणा शहरात एफआयआर दाखल झाल्यानंतर आता बिहार पोलिसांची एक टीम मुंबईत तपासासाठी पोहोचली आहे.

Updated: Jul 31, 2020, 03:55 PM IST
EXCLUSIVE: सुशांत सिंहचे बँक अकाऊंट डिटेल्स उघड, पाहा कुणाला किती पैसे दिले... title=

मुंबई  : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात बिहारच्या पाटणा शहरात एफआयआर दाखल झाल्यानंतर आता बिहार पोलिसांची एक टीम मुंबईत तपासासाठी पोहोचली आहे. बिहार पोलिसांनी आज सुशांत सिंह राजपूतच्या बँक अकाऊंटच्या डिटेल्स चेक केल्या. 

यात सुशांतसिंह राजपूत यांनी बँक खात्याचा वारस म्हणून आपली बहिणी प्रियंका सिंहचं नाव दिलं आहे. एवढंच नाही रिहा चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्तीचा महागळा विमान प्रवास आणि हॉटेलात राहण्याचा खर्च देखील सुशांतसिंह करत होता.

12.10.19- विविड्रेजला 72,000 रुपयांचे पेमेंट
14.10.19- शोविक चक्रवर्तीला फ्लाइट खर्च 81 हजार रुपये
15.10.19- शोविक चक्रवर्तीचा हॉटेल खर्च 4  लाख 72 हजार रुपये
26.11.19- न्यू टर्म डिपॉझिट 20,000,000 रुपये

सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी जेव्हा बँक स्टेटमेंट चेक केलं, तेव्हा मुलगा सुशांतच्या अकाऊंटमधून एका वर्षात १७ कोटी रूपये खर्च झाले आहेत. यात १५ कोटी रूपये एका खात्यात ट्रान्सफर करण्यात आले होते, ज्याच्याशी सुशांतचं काहीही घेणं देणं नसल्याचं त्याच्या वडिलांनी आरोपात म्हटलं आहे.

सुशांतच्या वडिलांनी अशी देखील मागणी केली आहे की, रियाच्या सर्व अकाऊंटचे डिटेल्स चेक झाले पाहिजेत, त्यावरून रियाने त्यातील किती पैशांचा आणि कसा उपयोग केला.