मुंबई : सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी सुरु आहे. या प्रकरणात दररोज नवनवी माहिती समोर येतेय. सुशांत तणावात असताना त्याच्यावर स्पर्शाने उपचार केल्याचा दावा ठाण्यात राहणाऱ्या मोहन जोशी यांनी केलाय. त्यांनी बनवलेला एक व्हिडीओ सोशल मीडियात सध्या चर्चेत आहे.
स्पर्शाने उपचार करण्याचा दावा करणारे मोहन जोशी हे ठाण्यात राहतात. उपचार करण्यासाठी ते रिया आणि सुशांतने बोलावल्याने वॉटर स्टोन हॉटेलवर गेले होते. उपचार केल्यावर सुशांत बारा झाला असा त्यांचा दावा आहे.
स्टेट बॅंकेतून रिटार्ड झालोय. मी स्पर्श उपचार करतो. १९८२ मध्ये एका सहकाऱ्याला गॅंगरीन झालेला त्याला मी स्पर्श उपचाराने बरं केलं. ही सेवा मी विनामुल्य करतो., कोणतीही अपेक्षा ठेवून करत नाही. एक हात नाभीवर आणि एक हात पाठीवर ठेवतो. माझ्या हातातून उर्जा निघते त्यातून आजार बरा होतो असा त्यांचा दावा आहे.
मी काहीच वेगळ करत नाही. केवळ डोकं आणि कपाळावर हात लावतो. आणि ती व्यक्ती बरी व्हावी प्रार्थना करतो असे जोशी या व्हिडीओमध्ये सांगतायत.
सुशांत किंवा रियाने मला गुगलवर शोधलं. मी स्वत:ची जाहीरात कधी करत नाही. रियाने मला फोन केला. ललित हॉटेलच्या मागे तो क्लब होता. माझा उपचार ५ मिनिटं असतो. तो तणावात आहे असं मला सांगितलं गेलं. मी २५ मिनिटं तिेथे होतो. दुसऱ्या दिवशी सुशांत हसल्याचं तिकडून फोन आला. सुशांत खूप दिवसांनी हसला असे सांगणारा फोन आल्याचे जोशी म्हणाले.
दरम्यान मला एक दिल्लीला कॅन्सर रुग्णासाठी जायचं होत. त्यानंतर तुम्हाला यायाचंय तर ठाण्याला या असं मी त्यांना सांगितलं होतं. पण मग ते आले नाहीत. तिथपासून माझा आणि त्यांचा संपर्क नसल्याचे मोहन जोशी म्हणाले.
त्यांच्या या दाव्यात किती तथ्य आहे हे येणाऱ्या दिवसात स्पष्ट होईल.