कतरिना-विक्कीच्या लग्नादरम्यान सलमान खानकडून चाहत्यांना मोठं सरप्राईज

कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या शाही लग्नाकडे सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांच लक्ष लागलं आहे. 

Updated: Dec 8, 2021, 07:22 PM IST
कतरिना-विक्कीच्या लग्नादरम्यान सलमान खानकडून चाहत्यांना मोठं सरप्राईज title=

मुंबई : ९ डिसेंबरला म्हणजेच  उद्या या वर्षातील सगळ्यात मोठा आणि बहुचर्चित विवाहसोहळा पार पडणार आहे. कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या या शाही लग्नाकडे सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांच लक्ष लागलं आहे. लोकंदेखील या लग्नाबद्दलच्या सगळ्या अपडेट जाणून घ्यायच्या उत्सुक आहेत. कतरिना आणि विकीच्या लग्नासाठी पाहुणे राजस्थानला पोहोचले आहेत. 

जेवणाच्या मेन्यूपासून ते लग्नाच्या ठिकाणापर्यंत सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे. त्याचबरोबर लोकं सलमान खानबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बोलत आहेत. त्यांचे अनेक मजेदार मीम्सही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या सगळ्यामध्ये सलमानचं एक ट्विट समोर आलं आहे, ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

सलमान खान 10 डिसेंबरला इंटरनॅशनल  एरीना परेड जोन सौदी अरेबियाची राजधानी रियाधला जाणार आहे. आणि त्याने त्याच्या ट्विटर अकाउंटवर यासंबंधी एक पोस्ट शेअर केली आहे. 
सलमान खान रियाध इंटरनॅशनल एरिना परेड झोन कार्यक्रमात परफॉर्म करणार असून त्याने आपल्या ट्विटमध्ये ही माहिती दिली आहे. त्यानं लिहिलंय की, ''हाय रियाध…आशा आहे की, १० डिसेंबर रोजी आपणा सर्वांना इंटरनॅशनल एरिना परेड झोनमध्ये भेटू''.

विशेष म्हणजे, सध्या लोकांच्या नजरा कतरिना आणि विकीच्या लग्नावर तसंच सलमान खानकडे आहेत. सलमान कतरिनाच्या लग्नाला जाणार की नाही यावर आतापर्यंत सस्पेन्स कायम आहे. कतरिना सलमान खानच्या खूप जवळची मानली जाते. त्यामुळे भाईजान तिच्या लग्नाला नक्कीच हजेरी लावणार असल्याचं लोक म्हणत आहेत.