Vicky-Katrina पाठोपाठ गानकोकिळा लता मंगेशकर यांची नात अडकणार लग्नबंधनात?

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. 

Updated: Dec 8, 2021, 07:05 PM IST
Vicky-Katrina पाठोपाठ गानकोकिळा लता मंगेशकर यांची नात अडकणार लग्नबंधनात?  title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. यातच आता श्रद्धा कपूरच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. श्रद्धा कपूर तिचा बॉयफ्रेंड रोहन श्रेष्ठसोबत लग्नाच्या चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या आहेत. श्रद्धा कपूरने कधीही तिच्या बॉयफ्रेंडबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही, मात्र अभिनेत्री फोटोग्राफर रोहन श्रेष्ठसोबत अनेकदा स्पॉट झाली आहे. एका जवळच्या नातेवाईकाने श्रद्धा कपूरच्या लग्नाबाबत संकेत दिले आहेत, त्यानंतर चाहत्यांमध्ये तिच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे.

गानकोकिळा लता मंगेशकर यांचं शीही श्रद्धा कपूरसोबत खास नातं आहे. खरंतर श्रद्धा कपूरचे आजोबा लता मंगेशकर यांचे चुलत भाऊ आहेत. त्यामुळे नात्याने लता मंगेशकर आणि आशा भोसले या श्रद्धा कपूरच्या आजी लागतात. त्याचबरोबर पद्मिनी कोल्हापुरे श्रद्धा कपूरची मावशी आहे.

खरं तर, श्रद्धा कपूरची मावशी आणि अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे हिने तिच्या ये गलियां ये चौबाराचं जुनं व्हर्जन रिक्रिएट केलं होतं. जे श्रद्धा कपूरने नुकतंच तिच्या सोशल मीडियावर शेअर केलं आहे. श्रद्धाच्या पोस्टवर तिची मावशी पद्मिनी कोल्हापुरे हिने 'तुझ्या आणि वेदिकाच्या लग्नात मी हे गाणं गाईन' अशी कमेंट केली आहे.

पद्मिनी कोल्हापुरे यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं की, श्रद्धा आणि वेदिका त्यांना त्यांच्या मुलींसारख्या आहेत. त्यांना नेहमीच हौस होती की, आपल्या मुलींच्या खास दिवशी हे गाणं गायचं . पद्मिनी कोल्हापुरे यांच्या या इशाऱ्यानंतर चाहत्यांमध्ये अभिनेत्रीच्या लग्नाची उत्सुकता पाहायला मिळत आहे.

एका मुलाखतीत शक्ती कपूरने श्रद्धा आणि रोहनच्या लग्नाविषयी सांगितलं होतं की, रोहन श्रेष्ठ हा त्यांचा फॅमिली फ्रेंड आहे आणि त्याने अद्याप श्रद्धासाठी तिचा हात मागितलेला नाही. या अभिनेत्याने असंही म्हटलं होतं की, 'मी त्यांच्या वडिलांना अनेक वर्षांपासून ओळखतो. रोहनही अनेकदा त्यांच्या घरी जातो पण त्याने अजून श्रद्धाचा हात मागितलेला नाही. याशिवाय आजची मुलं काही गोष्टी स्वतः ठरवतात. जर श्रद्धाने आपला जीवनसाथी स्वत: निवडल्याचे सांगितले तर ते कधीही नकार देणार नाही.